‘ते जर स्टँडअप कॉमेडीयन क्षेत्रात गेले असते तर…’, फडणवीस यांची राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका – Marathi News | “If he is a stand up comedian…” – Devendra Fadnavis criticizes Raj Thackeray.


मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मनसेच्या रेल्वे संघटनेच्या वर्धापनदिनाच्या भाषणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता त्यास अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावात देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की परवा मी विधान सभेत भाषण केल्यानंतर अनेक लोकांना मिर्ची लागली.पण अतिशय स्पष्टपणे सांगितले की मिसिंग लिंकवर त्या ठिकाणचा पुल, केबल स्टेड ब्रिज आहे, जगातले सगळ्यात मोठे टनेल त्या ठिकाणी आहेत. एकालाही क्रॅक गेला नाही काही जणांनी टीका केली ७ हजार कोटी रुपये पाण्यात गेले. हा माझा अपमान नाही, महाराष्ट्राचाच अपमान आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की  भाडे की टट्टू म्हटले, तर काही लोक म्हणाले मुख्यमंत्री सुसंस्कृत बोलत नाहीत. भाडे के टट्टू म्हणालो तर काही जण म्हणाले की हिंदीत का बोलले. म्हणून त्यांना मी आता ‘भाटक गदर्भ’ म्हणतो. कोणाला समजले नसले तर सांगतो की याचा अर्थ सुपारीबाज असा आहे. मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो होतो. टोपी फेकली होती. मात्र, अनेकांना टोपी लागली. एक वाक्य हिंदीत बोललो. ते ज्यांना समजायला पाहिजे त्यांच्याऐवजी दुसऱ्यांनाच मिर्ची लागली, असे फडवणीस यांनी यावेळी सुनावले. हिंदीत का बोललो, असे मिमिक्री आर्टिस्ट बोलले. ते आमचे मित्र आहेत.त्यांचा राजकारणात आम्हाला धोका नाही. ‘ते जर स्टँडअप कॉमेडीयन क्षेत्रात गेले तर अनेकांचा कॉमेडिचे दुकान बंद केले असते असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.

मनसेच्या रेल कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. मिसिंग पुलाच्या अपघाता संदर्भात प्रश्न विचारले तर महाराष्ट्राचा अपमान कसा असा सवाल राज ठाकरे यांनी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *