काम आहे, घरी ये… बोलावून गेट केलं बंद, विद्यार्थ्याशी नको ते चाळे, शिक्षकाला अटक; एकच खळबळ – Marathi News | UP Teacher Arrested for Student abuse : POCSO Case Filed


आपल्याकडे गुरु, शिक्षक हा देवासमान मानला जातो. विद्यार्थ्यांना फक्त शिकवण्याचीच नव्हे तर त्यांना घडवण्याची, चांगलं- वाईट ओळखण्याची जबाबदारीहीशिक्षकावर असते. पण तोच शिक्षक जर भक्षक बनला तर ? शिक्षकानेच नको ते कृत्य केलं, तर काय करायचं ? अशी एक भयानक घटना उत्तर प्रदेशातील घडली आहे. जिथे एका शिक्षकाने विद्यार्थ्याशी अश्लील वागत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणई आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याचा बेड्या ठोकत अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका 14 वर्षीय विद्यार्थ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका प्राथमिक शिक्षकावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षकाला अटक केली आहे आणि त्याला कारागृहात पाठवले आहे. दरम्यान, मूलभूत शिक्षण विभागाने या शिक्षकाला निलंबित केले असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाची ओळख गुलाम मुस्तफा (उर्फ पप्पु वय 50) अशी पटली आहे. तो बलिया येथील एका प्राथमिक शाळेत कार्यरत होता.

घरी बोलावून दार बंद केलं आणि..

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 5 जुलै रोजी आरोपी शिक्षकाने एका विद्यार्थ्याला काही कामाचे निमित्त सांगून आपल्या घरी बोलावले. तो विद्यार्थी घरी आल्यानंतर त्याने दरवाजा बंद केला आणि त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. मात्र तो विद्यार्थ्याने कशीबशी हिंमत करत आपली सुटका केली आणि तो तिथून निसटून घरी पोहोचला. अत्यंत घाबरलेला असूनही घरी आल्यावर त्याने आपल्या कुटुंबीयांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. ते ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर, पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली.

संबंधित शिक्षकाला गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे. तसेच, विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमांनुसार कठोर विभागीय कारवाई केली जाईल, असं या प्रकरणी, जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी (BSA) मनीष सिंह यांनी सांगितलं.

या घटनेनंतर परिसरात नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. दरम्यान, पोलिसांचे म्हणणे आहे की तपास सुरू असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *