खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ? थेट मुलाच्या अटकेसाठी मोर्चा, विलास घुले हत्या प्रकरणात.. – Marathi News | Beed Protest march was organized to demand the arrest of MP Bajrang Sonawane son in connection with the Vilas Ghule case


बीडच्या केज येथील विलास घुले हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. विलास घुले याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. या हत्या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आल्याने खळबळ उडाली. सातत्याने घुले कुटुंबियांवर बजरंग सोनवणे यांचा मुलगा साैरभ सोनवणे याच्यावर आरोप केले जात आहेत. खऱ्या सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे. आरोपी ज्यावेळी विलास घुले याला मारहाण करत होते, त्यावेळी ते साैरभ बजरंग सोनवणे याचे नाव घेत होते. विलास घुलेच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी बजरंग सोनवणे आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केली. पण पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. साैरभ बजरंग सोनवणे याच्या नावाचा उल्लेख तक्रारीत केला. या प्रकरणात साैरभ सोनवणेची चाैकशी देखील करण्यात आली. एसआयटीकडून ही चाैकशी करण्यात आली.

विलास घुले हत्या प्रकरणाला दोन आठवडे उलटले. मात्र, अद्याप अपेक्षित कारवाई पोलिसांनी केली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विलास घुले यांना आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी केजमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला. खासदार पुत्राला अटक करा, विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावा या मागणीसाठी केज शहरात मोर्चा काढण्यात आला.

पुरवणी जबाबात नाव दिले असून खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करा या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. खासदार पुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, आरोपींना खासदाराकडून पाठीशी घातले जात आहे असा आरोप रमेश घुले यांनी केला.

खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून मुलाला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच ते मुख्यमंत्र्यांना भेटले होते असाही आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. या प्रकरणात ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेत आहेत. विलास घुलेच्या हत्येनंतर न्यायासाठी कुटुंबिय थेट केज पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाला बसले होते. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांसोबत फोनवरून संवाद साधला, ज्यानंतर त्यांनी तब्बल 11 तासांनी आंदोलन संपवले आणि विलास घुलेवर अत्यंसस्कार केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *