Weekly Horoscope 13 To 19 July 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै (June 2026) महिना हा अनेकांचे नशीब पालटणारा ठरत आहे, याच महिन्याचा एक नवा आठवडा लवकरच सुरू होतोय. हा आठवडा 13 ते 19 जुलै असा आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल, या काळात ग्रहांचे शुभ योग बनत आहेत. हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी मेष ते कन्या अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी जुलैच्या या आठवड्यात करिअरच्या दृष्टीने सकारात्मक घडामोडी घडतील. नवीन प्रोजेक्ट किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहील, मात्र चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च होऊ शकतो. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल, तर विवाहितांनी जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखाद्या शुभकार्याची बातमी मिळेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरेल. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात रखडलेले व्यवहार पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल, तसेच पूर्वीची गुंतवणूक फायदा देऊ शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. अविवाहितांसाठी विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास चांगले यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्थेची काळजी घ्या.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी आठवड्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो, पण शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारीचा विचार करू शकता. आर्थिक स्थिती सुधारेल आणि अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. प्रेमसंबंधात संवाद वाढल्याने गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल, मात्र तुमची मेहनत वाया जाणार नाही. व्यवसायात मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. प्रेमजीवनात संयम ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल. योग आणि ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी यश, मान-सन्मान आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होईल. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. विवाहितांच्या जीवनात गोडवा वाढेल. प्रवासाचे योग असून ते लाभदायक ठरू शकतात. आरोग्य चांगले राहील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी या आठवड्यात भाग्याची उत्तम साथ मिळाल्यामुळे अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात मोठा करार होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभामुळे आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासोबत धार्मिक किंवा पर्यटनाचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील.
हेही वाचा :
Mahalakshmi Rajyog 2026: 3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)