विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
