Harshwardhan Sapkal and Devendra Fadnavis: ‘सगळं ज्ञान आमच्याकडेच, आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध’; देवेंद्र फडणवीसांचा अहंकार विशिष्ट विचारांचे प्रतिनिधित्व करणारा: हर्षवर्धन सपकाळ


Harshwardhan Sapkal and Devendra Fadnavis: मिसिंग लिंकवरुन टीका झाल्यानंतर आणि ते ते इन्फ्रामॅन नाही डिझास्टर मॅन आहेत हे समोर आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना इतका राग आला आणि त्यांनी सभागृहात विरोधकांवर आगपाखड केली. देवेंद्र फडणवीस सारखं सांगतात, मिसिंग लिंक मी बांधला. पण तुम्ही तुम्ही स्वत:ची शेती, वाडा किंवा कुटुंबातील दागिने विकून मिसिंग लिंक बांधलेला नाही. एवढा मी मी पणा आणि अहंकार योग्य नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते शुक्रवारी बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना अहंकाराची बाधा झाल्याचे म्हटले. (Maharashtra Politics news)

मी मिसिंग लिंकबाबत टीका केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  ज्याला काही समजत नाही, अक्कल नाही, त्याच्यावर काय बोलायचे. हादेखील देवेंद्र फडणवीस यांचा अहंकार आहे. मी त्यांच्या मान्यतेची कीव करतो. देवेंद्र फडणवीस ज्या विचारांच्या पठडीतून समोर आले आहेत, त्यांचा विचार आहे की, सगळं ज्ञान आमच्याकडे, आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध आहेत. हाच हेका देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपातून पुन्हा एकदा दिसून आला. दहा वर्षांनी आम्ही असू पण विरोधक शिल्लक राहणार नाहीत, हे त्यांचे वक्तव्य त्यांच्या पक्षाची विचारसरणी दाखवणारे आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधकांविषयी बोलताना ‘थोबाड’, ‘कुत्रा’ असे शब्द वापरले. ही भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाही. हे नळावरचे भांडण नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी पानपट्टीवरील टपोरीची भाषा शोभत नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर राज्यभरातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. नागरिक रोष व्यक्त करत आहेत. विरोधक म्हणून आम्ही संवैधानिक टीका करत आहोत. या टीकेच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेला ‘भाडे के तट्टू’ हा शब्द निषेधार्ह आहे. त्यांच्या सर्व टीकेत महाराष्ट्र म्हणजे तेच हीच भूमिका आहे. ही भूमिका म्हणजे सर्वसामान्य जनतेचा अपमान आहे. मिसिंग लिंकवरुन टीका केल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा काय अपमान झाला. त्यांना कोणी शिव्या दिल्या की एकेरीत बोलले. मिसिंग लिंक गळते तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होते. त्याची कारणं समोर आली आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात, एक कोटी खोटारडे मेल्यावर काही लोक जन्माला येतात. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की, आपल्या दोघांची नार्को टेस्ट करु. मिसिंग लिंक आणि समृद्धी महामार्गात किती भ्रष्टाचार झाला हे समोर येऊ द्या, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

आणखी वाचा

Prithviraj Chavan & Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकवरुन पृथ्वीबाबांवर आरोपांच्या फैरी झाडल्या, पृथ्वीराज चव्हाणांचं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *