Sairat Fame Arbaz Shaikh: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairaat) या सिनेमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच त्याच्या वडिलांना गंभीर आजारामुळे सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या वडिलांवर उपचार सुरु असताना त्याच्याकडून औषधं मागवण्यात आली होती. पण रुग्णालयात (Solapur hospital) कशा पद्धतीने लूट होते, हे त्यानं आपल्या व्हिडीओतून सांगितलं. रुग्णालयातील मेडिकलमधून औषध घेणं बंधनकारक नसतानाही, रुग्णालयाच्या एकाच मेडीकलमधून औषधं घेण्यासाठी कशी जबरदस्ती केली जाते, हे त्यानं आपल्या व्हिडीओतून सांगितलं. यावेळी अरबाज भावुक झाला असल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्याने व्हिडीओतून आर्थिक मदतीसाठीही आवाहन केले आहे. दरम्यान अरबाजने व्हिडीओतून केलेल्या आरोपांवर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अमजद अली सय्यद यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अरबाज शेखच्या आरोपांवर हॉस्पिटल प्रशासनाची बाजू समोर (Sairat Fame Arbaz Shaikh on Nobel hospital)
सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याने सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले होते. त्यानं व्हिडीओ शेअर करुन आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला. दरम्यान, अरबाजने केलेल्या गंभीर आरोपांनंतर हॉस्पिटल प्रशासनाची बाजू समोर आली आहे. अभिनेता अरबाज शेख याने हॉस्पिटलवर केलेले आरोप चुकीचे असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे. ‘आम्ही कोणतीही चूक केलेली नाही’, असं देखील हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे.
सोलापुरातील नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजद अली खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून आपली बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ‘अरबाज शेख किंवा कोणत्याही रुग्णाला औषधं घेण्यासाठी कोणतेही बंधन घातलेले नव्हते. अरबाज यांच्या वडिलांना न्युरो संदर्भातील आजार होता, त्यामुळे त्यांना आधीच खर्चाची कल्पना दिलेली होती’, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘मात्र त्यानंतर देखील त्याने हा व्हिडीओ का केला? याची कल्पना आम्हाला नाही, पण आम्ही कोणतीही चूक केलेली नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अरबाज शेख याने आपल्या व्हिडीओत नेमकं काय म्हटलं?
‘माझ्या पप्पांना ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापुरातील एका रुग्णालयात अॅडमिट केलं होतं. नंतर हृदयाचा प्रॉब्लेम झाला म्हणून नोबल हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं. पण या हॉस्पिटलचा मला सर्वात घाण अनुभव आला होता. सर्वात आधी 10 हजार रुपये डिपॉझिट भरले. नंतर मला गोळ्यांची चिठ्ठी दिली. त्यांनी मला, हॉस्पिटलच्या मेडीकलमधून गोळ्या आणि इंजेक्शन घ्यावे लागतील, असं सांगितलं. ते सर्व औषधांची किंमत 40 हजारांहून अधिक किंमतीची होती’.
‘त्या गोळ्या जर मी बाहेरुन घेतले तर, मला अर्ध्याहून कमी किमतीत मिळू शकतात. पण इथे एवढी लूट होतेय. माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचं आहे. मला त्यांना या हॉस्पिटलमधून शिफ्ट करावं लागेल’, असं म्हणत अरबाज भावुक झाला. यावेळी त्याने आर्थिक मदतीसाठीही विनंती केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
‘वेलकम टू द जंगल’ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?