भारतात ऑस्ट्रेलियाची सुपर इन्व्हेस्टमेंट! 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक, पीएम मोदी म्हणाले काय? – Marathi News | PM Narendra Modi Visit to Australia India and Australia forging stronger cooperation as trusted and natural partners 4 trillion dollars deals


ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Visit to Australia: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पूर्वेतील देशांच्या दौऱ्यावर आहेत. इंडोनेशियानंतर ऑस्ट्रेलियातही पंतप्रधानांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलिय सुपरने भारतात मोठी गुंतवणूक केली. भारताच्या नॅशनल इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये (NIIF) ऑस्ट्रेलियन सरकारने आणखी 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. भारतीय चलनात हा आकडा 4,200 कोटी रुपये इतकी आहे. भारतातील पायाभूत सोयी-सुविधा, ऊर्जा, वाहतूक, विकास प्रकल्पांना या निधीतून चालना मिलेल. भारतीय अर्थव्यवस्थेच्या भरारीवर या गुंतवणुकीने शिक्कामोर्तब केले आहे. ऑस्ट्रेलियन सुपरने भारतात मोठी गुंतवणूक वाढवली आहे.

दोन्ही देशातील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होईल

भारत आणि ऑस्ट्रेलियातील सीईओ फोरममध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रमुख उद्योगपती आणि व्यावसायिकांशी संवाद साधला. भारताच्या विकास यात्रेत ऑस्ट्रेलियाने सक्रीय सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले. तर या नवीन गुंतवणुकीमुळे दोन्ही देशातील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होण्यास मदत होईल. दीर्घकालीन गुंतवणूक भागीदारीला नवीन गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

CEO फोरममध्ये पंतप्रधानांचे मोठे आवाहन

गुरुवारी मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेट झाली. त्यानंतर दोन्ही देशातील सीईओ फोरममध्ये ते सहभागी झाले. दोन्ही देशातील अग्रगण्य उद्योगजगतातील प्रतिनिधींना त्यांनी संबोधित केले. यावेळी मोदींनी देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. पायाभूत सुविधा विकास कामात गुंतवणूक करण्याचे उद्योजकांना आवाहन केले.

यावेळी जागतिक घडामोडींकडे मोदींनी लक्ष वेधले. जग अनिश्चितता, पुरवठा साखळीतील अडथळे आणि ऊर्जा संकटाचा सामना यावर त्यांनी भाष्य केले. अशा परिस्थितीत दोन्ही देशांनी विश्वासार्हय आणि नैसर्गिक भागीदार म्हणून एकमेकांसोबत उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी 2022 मध्ये दोन्ही देशात इकोनॉमिक कॉर्पोरेशन आणि ट्रेड ॲग्रीमेंट झाले होते. दोन्ही देशातील आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले आहेत. हा करार लागू झाल्यानंतर भारताची ऑस्ट्रेलियातील निर्यात वाढून दुप्पट झाली आहे. दोन्ही देशांतील उद्योगांना नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळाला आहे.

भारतात जलविद्युत प्रकल्प, हरित हायड्रोजन, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा क्षेत्रासंबंधी एक इकोसिस्टिम तयार करण्यात येत असल्याचे आणि त्यात गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात अनेक आघाडीच्या कंपन्या पुढे आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचे तंत्रज्ञान, भांडवल आणि नैसर्गिक संसाधने यामुळे ही प्रक्रिया वेगवान होऊ शकते, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *