Ketan Murder Case: सिया-चेतनचे अगोदरच गुपचूप लग्न? केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा गौप्यस्फोट … त्या व्हॉट्सॲप चॅटमधून धक्कादायक खुलासा – Marathi News | Ketan Agarwal Murder Case Did Siya goyal and Chetan Chaudhari secretly marry before Major revelation in the Ketan Agarwal murder case Shocking details emerge from that WhatsApp chat


केतन अग्रवाल, सिया गोयल, चेतन चौधरी, लोहगड

Siya Goyal-Chetan Chaudhari Marriage: केतन अग्रवाल हत्याप्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. दोघांच्या हाती लागलेल्या व्हॉट्सॲप चॅटआधारे पोलिसांनी हा दावा केला आहे. केतन अग्रवाल याची 18 जून रोजी लोहगडावरून ढकलून हत्या करण्यात आली होती. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. सध्या दोघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

कुटुंबिय अंधारात? गुपचूप लग्न

मध्यंतरी पोलिसांनी सिया गोयलला तिच्या घरी नेत दुसरा मोबाईल जप्त केला होता. मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या आधारे पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. या दोघांची डिजिटल कुंडलीच पोलिसांनी खंगाळून काढली. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 19 फेब्रुवारी रोजी सिया आणि केतन या दोघांचा धूमधडाक्यात साखरपुडा झाला होता. त्याच्या मागेपुढेच हे लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस अजून याविषयी सखोल चौकशी करत आहेत. हे लग्न कुटुंबियांपासून लपून केल्याचा दावा करण्यात येत असला तरी काही घडामोडी पाहता कुटुंबातील सदस्यांना त्याची कुणकुण असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

राजस्थानमध्ये स्थायिक होण्याचा प्लॅन

सिया आणि चेतन यांची मैत्री आणि नंतर प्रेम झाले. दोघेही राजस्थानलाही फिरायला गेले होते. उदयपूर आणि जोधपूर येथे दोघे फिरायला गेले होते. त्यांच्या मित्रांनी दोघांना एकत्र पाहिले होते. दोघांनी मित्रांना लग्न करून राजस्थानमध्येच स्थायिक होण्याची गोष्टही बोलून दाखवली होती. चेतन सियाला मारवाडी महिलांचे पेहराव आणि राजस्थानी संस्कृतीची माहिती देत होता. व्हिडिओ आणि रील्स दाखवत होता. लग्नानंतर पुणे सोडून उदयपूर अथवा जोधपूर येथे स्थायिक होण्याचा दोघांची इच्छा होती. सद्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर अनेक बाबी समोर येतील आणि पोलीस तपासाला बळकटी मिळेल. नोव्हेंबर 2026 मध्ये सिया आणि केतनचे लग्न होणार होते. सियासोबत सुखी आयुष्याची स्वप्न रंगवणाऱ्या केतनला तिच आपली मारेकरी ठरेल हे स्वप्नातही वाटले नाही. 18 जून रोजी चेतन आणि सियाने त्याला लोहगड किल्ल्यानवरून ढकलले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *