Pravin Tarde Targets Trollers Over Shah Rukh Khan: ‘मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये…’; शाहरुखवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाले…


Pravin Tarde Targets Trollers Over Shah Rukh Khan: मराठी सिनेसृष्टीला (Marathi Film Industry) सध्या सुगीचे दिवस आलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ‘राजा शिवाजी’नंतर (Raja Shivaji) आलेल्या ‘देऊळ बंद 2’नं (Deool Band 2) बॉक्स ऑफिस (Box Office Collection) गाजवलं आणि 100 कोटींचा गल्ला जमवलाय. अजूनही या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. ‘देऊळ बंद 2’ निमित्त दिलेल्या सर्वच मुलाखतींमध्ये प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी सिनेमासाठी मदत करणाऱ्यांचे आभार मानलेत. यामध्ये बॉलिवूडचा (Bollywood News) किंग शाहरुख खानचाही (Shah Rukh Khan) समावेश होता. 

प्रवीण तरडे (Marathi Actor Pravin Tarde) यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘देऊळ बंद 2’ सिनेमाचं बजेट मर्यादित असल्यामुळे पोस्ट-प्रॉडक्शनच्या काही कामांसाठी शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटनं आर्थिक सवलत दिलेली. या मदतीबद्दल त्यांनी जाहीरपणे शाहरुख खान आणि त्याच्या कंपनीचे आभार मानलेले. मात्र, यानंतर सोशल मीडियावर काहींनी त्यांच्यावर धर्माच्या आधारावर टीका करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण, आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रवीण तरडे यांनी ट्रोलर्सना चांगलंच झोडून काढलंय. एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने मदत केली असेल, तर त्याचे आभार मानण्यात धर्म, जात किंवा पंथ आड येत नाही. चांगुलपणाला धर्म नसतो, असं प्रवीण तरडे म्हणाले आहेत. 

प्रवीण तरडे शाहरुख खानमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर नेमकं काय म्हणाले? (Pravin Tarde On Shah Rukh Khan)

प्रवीण तरडे यांनी नुकतंच ‘पॉडकट्टा’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना ‘देऊळ बंद 2’चे दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, “इथे हिंदू-मुस्लीम म्हणण्याचा प्रश्न काय आहे? तो सिनेमावाला, मी सिनेमावाला. मी त्याच्याकडे (रेड चिलीज स्टुडिओमध्ये) डिस्काउंट मागितला आणि त्यानंतर त्यानं शाहरुखनं त्याच्या टीमला इतकंच विचारलं की, चित्रपट चांगला आहे की नाही? सगळेजण म्हणाले, अप्रतिम सिनेमा आहे. म्हणून त्याने पैसे कमी केले. DCP (Digital Cinema Package थोडक्यात सिनेमाची कॉपी) काढायचा होता. पैसे पूर्ण भरल्याशिवाय DCP अजिबात देत नाही. पण, शाहरुख तेव्हा म्हणाला, DCP द्या…बिलाचं नंतर बघूया.”

प्रवीण तरडे पुढे म्हणाले की, “त्यानं नुसता डिस्काऊंटच दिला नाही, तर थेट आम्हाला डीसीपी (डिजिटल सिनेमा पॅकेज – चित्रपटाची फायनल कॉपी) देऊन टाकली. सिनेमा रिलीज करायचा होता आणि आमचे पैसे भरायचे राहिले होते. तो म्हणाला, ‘पहिली डीसीपी द्या, बिलाचं नंतर बघू’ हा त्याचा मोठेपणा नाही का रे? जर एखाद्यानं एवढ्या मोठ्या मनानं आपल्याला मदत केली, तर जात-पात आणि धर्म बघून आपण त्याचे उपकार विसरायचे का? ते मानलेच पाहिजेत…”

“जिथे हिंदुत्ववादाचा प्रश्न आहे, तिथे मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये. ज्यावेळी मी ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमा केला, त्यात दिसला शेतकरीच ना! ज्यावेळी शाहरुख खानचे आभार मानायचे होते, तेव्हा मानले ना! माझी हिंदुत्ववादी विचारसरणी आणि शाहरुख खानचे आभार याचा संबंधच नाहीये. जो चांगला आहे तो चांगला आहे. त्यातही आम्ही एका सिनेमामुळे जोडलो गेलो होतो. आता सलमान खान सुद्धा त्याच्या घरी गणपती आणतोच ना…बरं तो सोशल मीडियावर हे सगळं शेअर सुद्धा करतो…”, असं प्रवीण तरडे म्हणाले. 

“जिथे विचार मांडायचे असतात…तिथे माणसाने कणखर राहिलंच पाहिजे. आता आम्ही गरजू मुलांना मदत करतो…तेव्हा आपण त्यांना विचारसरणीबद्दल विचारत नाही. गरजवंताला विचारसरणी आणि धर्म नसतो’ असं प्रवीण यांनी शेवटी सांगितलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amitabh Bachchan Purchase Land In Ayodhya Paid 15 Crore: “मी अमिताभ, मला अयोध्येत जमीन घ्यायचीय…”; पहाटे 3 वाजता ‘बिग बीं’नी फिरवला फोन, दुसऱ्या दिवशीच उरकून टाकला कोट्यवधींचा व्यवहार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *