Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Netflix वर कोणती वेब सीरिज पाहतात? या शोचेही आहेत खास फॅन – Marathi News | Maharashtra cm Devendra Fadnavis like to watch series on netflix The Blacklist and indian idol show


Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. राज्यात कुठे काय सुरु आहे, प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारीने लक्ष द्यावं लागतं आणि संबंधित अडचणींवर निर्णय घ्यावे लागतात. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना देवेंद्र फडणवीस यांना स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी वेळ देणं फार कठीण होतं. पण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढत विरंगुळ्याची गरज तर सर्वांना भासते. म्हणून देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या व्यक्त वेळापत्रकातून वेळ काढत किंवा प्रवासादरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर सीरिज पाहत असतात.

अनेक जण ऑफिस संपल्यानंतर घरी जात असताना किंवा रिकाम्या वेळेत सीरिज पाहत असतात. त्याचप्रमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रवासादरम्यान मोबाईलवर सीरिज पाहणं पसंत करतात. सध्या देवेंद्र फडणवीस नेटफ्लिक्सवर एक सीरिज पाहत आहेत. एवढंच नाही तर,टेलिव्हिजन लोकप्रिय रियालिटी शो इंडियन आयडलची गाणी आवडीने ऐकतात.

कोणती सीरिज पाहतात मुख्यमंत्री? 

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘मी प्रवासादरम्यान इंडियन आयडल हा कार्यक्रम पाहतो. मी इंडियन आयडल माझ्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन ठेवलं आहे. त्यातली गाणी मी ऐकत असतो… याशिवाय मला सीरिज पाहायला देखील आवडतात. सध्या मी अशा दोन – तीन सीरिज पाहत आहे. नेटफ्लिक्सवर ‘द ब्लॅकलिस्ट’ ही सीरिज आहे, ती सध्या मी पाहत आहे. सीरिज मी डाऊनलोड करुन ठेवली आहे…’ असं देखील मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सांगायचं झालं तर, देवेंद्र फडणवीस राजकारणात सक्रिय असले तरी, त्यांच्या पत्नी अमृता फडणवील यांचं कलेवर प्रेम आहे. अमृता फडणवीस गायिका आहेत. एवढंच नाही तर, आता त्यांनी बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे . नुकत्याच रिलीज झालेल्या ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातल्या एका गाण्यालाही त्यांनी आपला आवाज दिला आहे. अमृता यांच्या गाण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मुख्यमंत्री पाहत असलेली ‘द ब्लॅकलिस्ट’ सीरिज

2013 ते 2023 या कालावधीत या सिरीजचे एकूण 218 एपिसोड नेटफ्लिक्सवर रिलीज झाले. ही मूळ इंग्रजी सीरिज असून, ती हिंदी भाषेत उपलब्ध आहे. सीरिजमधील रेड ही भूमिका साकारणारी व्यक्ती एफबीआयला जगभरातल्या दहशतवादी, धोकादायक गुन्हेगार आणि माफिया यांना पकडायला मदत करते. त्यांच्याकडे गुन्हेगारांची यादी असते, म्हणूनच सीरिजचं नाव ‘द ब्लॅक लिस्ट’ आहे. सांगायचं झालं तर, मुख्यमंत्री ही सीरिज पाहत असल्यामुळे ‘द ब्लॅक लिस्ट’ सध्या चर्चेत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *