Hair Care : केस गळणं होईल कमी आणि वाढ होईल वेगानं, केस, टाळूच्या पोषणासाठी तेलांचे पर्याय | लाइफस्टाईल बातम्या


Last Updated:

तेलांमुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि यामुळे केसांची वाढीला प्रोत्साहन मिळतं. नियमितपणे आणि योग्य पद्धतीनं वापरल्यानं, केस लांब, दाट आणि निरोगी होतात. पाहूयात केसांच्या चांगल्या पोषणासाठी विविध तेलांचे पर्याय.

News18
News18

मुंबई : केसांच्या चांगल्या पोषणाची चिंता वाटत असेल तर त्याचं उत्तर इथे आहे. तेलांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे टाळूचं, केसांचं चांगलं पोषण होतं.

धावपळ, तणाव, प्रदूषण आणि केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केस गळणं आणि केसांची वाढ मंदावणं यांसारख्या समस्या वाढतात. यासाठी नैसर्गिक आणि विश्वासार्ह उपाय म्हणजे तेल.

तेलांमुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि यामुळे केसांची वाढीला प्रोत्साहन मिळतं. नियमितपणे आणि योग्य पद्धतीनं वापरल्यानं, केस लांब, दाट आणि निरोगी होतात. पाहूयात केसांच्या चांगल्या पोषणासाठी विविध तेलांचे पर्याय.

आर्गन ऑईल – आर्गन ऑईलला ‘लिक्विड गोल्ड’ असंही म्हटलं जातं. या तेलात व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे टाळूचं खोलवर पोषण होतं, कोरडेपणा कमी होतो आणि केसांची मुळं मजबूत राहतात. नियमित मालिश केल्यानं केस गळणं कमी होण्यास मदत होते आणि केसांची वाढ नैसर्गिकरित्या वेगानं होते.

खोबरेल तेल – खोबरेल तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यातलं लॉरिक ॲसिड केसांच्या मुळांपर्यंत खोलवर जाऊन प्रथिनांचा ऱ्हास रोखतं. हे तेल टाळूचा ओलावा टिकवून ठेवतं, कोंडा कमी करतं आणि नवीन केसांच्या वाढीसाठी मदत करतं. आठवड्यातून दोन-तीन वेळा खोबरेल तेल कोमट करुन लावल्यानं उत्तम परिणाम मिळतात.

रोझमेरी तेल – रोझमेरी तेल केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. टाळूवरील रक्ताभिसरण सुधारतं आणि त्याद्वारे केसांची मुळं म्हणजेच हेअर फॉलिकल्स सक्रिय राहतात. तसंच, केस विरळ होणं आणि केस गळणं यांसारख्या समस्यांवर उपाय म्हणूनही हे उपयुक्त ठरतं. नारळ किंवा बदामाच्या तेलासारख्या ‘कॅरियर ऑइल’मधे मिसळून याचा वापर करणं सर्वात फायदेशीर ठरतं.

एरंडेल तेल (Castor Oil) – केसांसाठी एरंडेल तेलाचाही मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यात ‘रिसिनोलिक ॲसिड’ असतं, यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. केस दाट होतात आणि नवीन केस उगवण्यास चालना मिळते. हे तेल अतिशय घट्ट असल्यानं ते नेहमी दुसऱ्या एखाद्या तेलात म्हणजेच कॅरियर ऑइलमधे मिसळूनच लावावं.

ऑलिव्ह ऑईल – ऑलिव्ह ऑईलचा वापर केस आणि त्वचा या दोन्हीसाठी केला जातो. यात आरोग्यदायी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे टाळूचं पोषण होतं आणि केसांच्या वाढीला मदत होते. खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी आणि केस मऊ, चमकदार बनवण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो.

जोजोबा तेल – जोजोबा तेल, टाळूवरच्या नैसर्गिक तेलासारखं म्हणजे सीबमसारखं असतं, त्यामुळे त्वचेची छिद्रं बंद न करता ते केसांना खोलवर ओलावा देतं. हे केसांच्या मुळांना म्हणजेच फॉलिकल्सना बळकट करतं आणि केसांच्या वाढीस मदत करतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *