Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका


IND vs ZIM नवी दिल्ली : बीसीसीआयकडून झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील संघ बीसीसीसीआयनं जाहीर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे टी 20 वर्ल्ड कपचा हिरो संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी 20  मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असणाऱ्या अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदरला वगळण्यात आलं आहे.  

Sanju Samson: संजू सॅमसनसोबत ‘या’ खेळाडूंना डच्चू 

बीसीसीआयनं झिम्बाब्वे विरोधातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आल्यानं जोरदार चर्चा होत असली तरी इतर बड्या खेळाडूंना देखील डच्चू देण्यात आला आहे. टीम इंडियाचा माजी उपकॅप्टन अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, हर्षित राणा यांना देखील वगळण्यात आलं आहे. इंग्लंड विरोधातील दुसऱ्या टी 20 सामन्यात 4 ओव्हरमध्ये 60 धावा देणाऱ्या रवि बिश्नोईला देखील वगळण्यात आलं आहे. वॉशिंग्टन सुंदरला देखील संघात संधी मिळालेली नाही. 

झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयांक यादव, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर).

मयंक यादव, रिंकू सिंगचं कमबॅक 

गेल्या दोन वर्षांपासून दुखापतग्रस्त असलेल्या मयांक यादवला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे. त्यानं भारताकडून शेवटचा सामना ऑक्टोबर 2024 मध्ये खेळला होता. याशिवाय रिंकू सिंगनं देखील कमबॅक केलं आहे. रिंकू सिंगनं भारताकडून शेवटचा सामना फेब्रुवारी 2026 मध्ये खेळला होता.  रिंकू सिंगला आयर्लंड आणि इंग्लंड विरोधातील टी 20 मालिकेत संधी मिळाली नव्हती. 

आयपीएलमधील तीन अनकॅप्ड खेळाडूंना संधी

टीम इंडियाच्या निवड समितीनं झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज यश ठाकूर, अशोक शर्मा आणि प्रभसिमरन सिंगला संधी देण्यात आली आहे. यश ठाकूर आणि प्रभसिमरन सिंग पंजाब किंग्जकडून खेळतात. अशोक शर्मा गुजरात टायटन्सकडून खेळतो. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्जमध्ये खेळणाऱ्या दोन खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. 

 भारत आणि झिम्बाब्वे टी 20 मालिका वेळापत्रक

पहिली टी 20 मॅच : 23 जुलै
दुसरी टी 20 मॅच : 25 जुलै
तिसरी टी 20 मॅच : 26 जुलै

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *