Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला


Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: मुंबईपुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक (Missing Link)  प्रकल्पाची अवस्था ही पहिल्याच दमदार पावसात उघड झाली.  राज्यात सध्या संततधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका बहुचर्चित मिसिंग लिंकलाही बसला.  काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकवर (Mumbai-Pune Expressway) खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळालं. खड्ड्यांचे फोटो समोर आले होते.  दरम्यान, सोमवारी पहाटे मिसिंग लिंक येथे भयंकर घटना घडली. मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळून संरक्षक भिंतीचा स्लॅब पुलावर कोसळला. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.  प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. याचा व्हिडीओही सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) यानेही शेअर केला. तसेच चार शब्दांत या प्रकारावर प्रतिक्रिया देत टोला लगावला. त्याने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं? पाहूयात.

मिसिंग लिंकच्या दु्र्घटनेवर हेमंत ढोमेची प्रतिक्रिया (Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link Incident)

नुकतंच हेमंत ढोमेनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने मिसिंग लिंकचा व्हिडीओ आणि या दरड कोसळल्याच्या घटनेवर 4 शब्दांत सणसणीत प्रतिक्रिया दिली.  त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘नावाला जागला, मिसिंग झाला’, असं त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  केवळ 4 शब्दांत त्याने या प्रकारावर प्रतिक्रिया देत संबंधित यंत्रणेला टोला लगावला. दरम्यान, व्हायरल व्हिडीओतून मिसिंग लिंकवर मोठ्या प्रमाणात पाणी पडत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सुदैवाने या पुलावर कोणतेही वाहन नसल्याने जिवितहानी टळली.  दरम्यान, मिसिंग लिंक सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

मिसिंग लिंकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून,  मिसिंग लिंक सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिसिंग लिंक सध्या वाहतुकीसाठी बंद असून, मिसिंग लिंकवर कोसळलेली माती आणि दगड हटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत बोगदा किंवा पुलाचे कोणतेही नुकसान झालेले नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, हेमंत ढोमेनं मिसिंग लिंकवर केलेली मार्मिक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *