राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला. धो धो पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यभरात पावसाने हाहाकार उडवला. मुंबई पुणे वाहतूक ठप्प आहे. मिसिंग लिंकजवळ मोठी दरड कोसळली. मुंबई पुणे रेल्वेसेवा देखील बंद आहे. मोठी दरड कोसळल्याची माहिती मिळतंय. राज्यात आजही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. 8 तारखेपर्यंत मोठा इशारा देण्यात आला. दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक काही वेळेसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती प्रशासनाकडून करण्यात आली.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली. मिसिंग लिंक मार्ग अद्याप बंद पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील एक लेनवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, मिसिंग लिंक मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसिंग लिंक मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू होण्यासाठी आणखी दोन ते तीन तास लागू शकतात.
दरम्यान, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक मात्र मिसिंग लिंक मार्गावरून सुरळीत सुरू असल्याची माहितीही महामार्ग पोलिसांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मिसिंग लिंकबद्दल बोलताना म्हटले की, मिसिंग लिंक बंद दरड कोसळण्याच्या बातम्या अनेक ठिकाणावरून येत आहेत. काही ठिकाणी रस्त्याला भगदाड देखील पडली आहेत. मिसिंग लिंक आधी वाटलं AI व्हिडीओ आहे.
मला विश्वास बसत नाही मिसिंग लिंक झाला. त्यावेळी आम्ही सरकारला शुभेच्छा दिल्या पाऊस झाला परंतु एवढं मोठं नुकसान पहिल्यांदा झाले मुख्यमंत्री यांनी तातडीने emrgency जाहीर करावी मिसिंग लिंक संदर्भात सर्व माहिती सरकारने देणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये लिहिले की, मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. भूस्खलन आणि सततच्या मुसळधार पावसामुळे या दोन्ही प्रमुख मार्गांवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई आणि मुंबई–पुणे या दोन्ही दिशांतील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक नसल्यास या मार्गांवरून प्रवास टाळावा आणि आपला प्रवास पुढे ढकलावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरात काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पर्यायी मार्गांवरही परिणाम झाला आहे. पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर काँक्रीटचा खांब कोसळल्याने ‘कनेक्टिंग लिंक’ आणि ‘मिसिंग लिंक’ दरम्यानचा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच जुना मुंबई–पुणे महामार्गावर काही ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे वाहतूक बंद आहे.
लोहगड किल्ल्याजवळील पाटन गावात भूस्खलनाची घटना घडली असून, त्यामध्ये एक कुटुंब अडकल्याची माहिती मिळाली आहे. बचावकार्य सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. जनहित आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.