आता शारीरिक सुखाची मागणी होत नाही, तर डायरेक्ट…, अभिनेत्रीकडून इंडस्ट्रीचं काळं सत्य उघड – Marathi News | Popular actress react on casting couch now they demand for love


इंडस्ट्रीमध्ये करियर करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. अनेक वाईट गोष्टींचा सामना अभिनेत्रींना करियरच्या सुरुवातील करावा लागतो. अशात अनेक अभिनेत्री स्वतःची ओळख भक्कम करण्याआधीच इंडस्ट्रीला राम राम ठोकतात. पण काही अभिनेत्री सर्व संकटांवर मात करतात, चांगल्या संधीच्या शोधात राहतात आणि स्वतःला झगमगत्या विश्वात सिद्ध करुन दाखवतात. सांगायचं झालं तर, फक्त हिंदी सिनेविश्वातच नाही तर, अन्य सिनेविश्वात देखील अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. पण आता कास्टिंग काऊचची व्याख्या बदलली आहे… असं एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं आहे…

ज्या अभिनेत्रीने कास्टिंग काऊचवर मोठं वक्तव्य केलं आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, भोजपुरी अभिनेत्री अंजना सिंह आहे. अंजना हिने कायम अशा भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला, ज्या प्रेक्षकांना आवडतील. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अंजना हिने कास्टिंग काऊचच्या बदललेल्या विचारांबद्दल सांगितलं आहे.

अंजना म्हणाली आधी भूमिकांच्या बदल्यात अभिनेत्रींकडून शारीरिक संबंधांची मागणी केली जायची, पण आता काळ बदललेला आहे. मला असं वाटतं आता कास्टिंग काऊचला बाजूला ठेवा, आता ते कास्टिंग काऊच राहिलेलं नाही. आता ते असं झालं आहे की, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. याचा अर्थ असा होतो की, जोपर्यंत प्रेम आहे, तोपर्यंत काम मिळणार. त्यानंतर कायम होणार हे आपल्याला माहिती नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

अंजना सिंह ही पहिलीच अभिनेत्री नाही जिने कास्टिंग काऊचबद्दल मोठा खुलासा केला आहे. याआधी देखील अनेका अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. बिग बॉस फेम फरहाना भट्ट हिने देखील सुरुवातीच्या काळात तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं आहे. फरहाना हिला सिनेमांमध्ये काम करण्याच्या बहाण्याने मुंबईत बोलवण्यात आलं होतं. पण तिच्यासमोर अट ठेवण्यात आलेली की, काही आठवड्यांसाठी दिग्दर्शकाच्या फार्महाऊसवर राहावं लगणार आहे. येथे अभिनेत्रीला काही तरी गडबड वाटली ज्यामुळे फरहान हिने तेथून पळ काढला.

फरहाना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बॉसनंतर तिच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली. आज फरहाना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. आता सोशल मीडियावर फरहाना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फरहाना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *