‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आला ‘कॉमेडीचा बाप’! VIDEO शेअर करताच सेलिब्रेटींच्या कमेंट्स, म्हणाला…


Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अर्शद वारसी, सुनिल ग्रोवर स्टारकास्ट असलेल्या प्रीतम ॲन्ड पेड्रो या राजकुमार हिरानींचं दिग्दर्शन असलेल्या वेबसिरीजमध्ये झळकल्याने चाहते त्याचं  प्रचंड कौतूक करत आहेत. गौरव सध्या यशाच्या शिखरावर असून काही दिवसांपूर्वीच त्याने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं. गौरवच्या नव्या घराची आणि त्याच्या लग्नाचीही काही दिवसांपूर्वी चर्चा रंगली होती. आता गौरवच्या आयुष्यात एक अतिशय खास अशी गोष्ट घडलीय. बॉलीवूडचे दिग्गज कॉमेडियन आणि अभिनेते जॉनी लिव्हर (Jonny liver) गौरव मोरेच्या घरी आले होते. या भेटीचा एक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओची सध्या एकच चर्चा आहे. 

गौरव मोरेने शेअर केला खास VIDEO ..

गौरव मोरे व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “काय पाऊस लागलाय ना? मजा एकदम. एक सरप्राइज आहे. आज माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. हे सरप्राइज मला, तुम्हाला सर्वांना आहे. हे सत्यात उतरण्यासाठी मी काहीतरी पुण्य केलं असेल किंवा माहीत नाही.. पण हे पुण्य हे जन्मी आपल्याला लाभणार आहे हे मला खरंच माहीत नव्हतं. काय आहे ते तुम्हाला सांगतो.”

“प्रिय जॉनी लिव्हर सर, आज आपले पाय आमच्या वास्तूला लागले आणि आम्ही धन्य झालो. आम्हीच काय माझ संपूर्ण घर, येणारी पिढी, मागची पिढी सगळेच सुखावलो. तुमचा सिनेमा पाहता यावा म्हणून केलेली धडपड कधी दारात उभ राहून, तर कधी खिडकीत उभं राहून, आपले सिनेमे बघितले आहेत. आपण आमच्यासारख्या मुलांसाठी एक ऊर्जा आहात, आमचे गुरू आहात. खूप खूप प्रेम सर.. असाच आशीर्वाद असू द्या आमच्यावर,” असं त्यानं या पोस्टखाली लिहिलंय.  

 

 

View this post on Instagram

 

या पोस्टखाली अभिनेते जितेंद्र जोशींसह अनेक सेलिब्रेटींनी आनंद व्यक्त केलाय. जितेंद्र जोशींनी आनंद अशी कमेंट केलीय. अनेकांनी गौरव मोरेवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हेमांगी कवीनेही तुझा खूप खूप अभिमान वाटतोय गौरी… असं म्हणत गौरवचं कौतूक केलंय.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *