मानखुर्द परिसरात झोपडपट्टी कोसळली, ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु


Mumbai Mankhurd News : मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच मानखुर्द परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मानखुर्दमध्ये झोपडपट्टी कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ग्राउंड प्लस दोन असे स्ट्रक्चर असलेली झोपडी कोसळली आहे. या घरामध्ये चार ते पाच जण अडकण्याची भीती वर्तवली जात होती. अशातच या घटने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मानखुर्दमध्ये जी+3 चाळीचा भाग कोसळला आहे. यामध्ये 4 ते 5 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती साडे आठ वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिरामागील जनता नगर परिसरात तळमजला अधिक तीन मजली (G+3) चाळीच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, चाळ क्रमांक 5 मधील दोन ते तीन घरांचा भाग कोसळला असून, ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, संबंधित विभागाचे कर्मचारी तसेच 108 रुग्णवाहिका सेवा दाखल झाली असून, शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अखेर या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

सोमवारी मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार 

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा ( Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. 
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पालघर आणि रायगड जिल्ह्यात देखील  शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (6 जुलै) अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी रायगड, नाशिक, पुण्यासह सातारा घाटमाथा परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे, तर मुंबई आणि ठाण्यासह इतर किनारी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि लहान मुलांचे हाल होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ खबरदारीचे पाऊल उचलले आहे.

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी प्रशासकीय यंत्रणा मात्र पूर्णपणे सतर्क मोडवर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या सुट्टीच्या कालावधीत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत किंवा कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार या सर्व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या (Disaster Management) कामात मदत करावी लागणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *