Pakistan Test Squads announced for West Indies and England Tours : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाबाबत पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बाबर आझम याच्याकडे पुन्हा एकदा कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून, खराब कामगिरीमुळे शान मसूदला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. बाबरने 3 वर्षांपूर्वी सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते, मात्र आता संघात त्याचे पुनरागमन झाले आहे. पाकिस्तान संघाला याच महिन्याच्या शेवटी वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची असून, या मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे.
कर्णधारपदावरून शान मसूदची हकालपट्टी
15 नोव्हेंबर 2023 रोजी बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कसोटी संघाची धुरा शान मसूदकडे सोपवण्यात आली. मात्र, मसूदच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाची कामगिरी अतिशय सुमार राहिली. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला 16 पैकी 12 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतक्या कमी कालावधीत एवढे सामने गमावणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे. पाकिस्तानच्या इतिहासात केवळ मिस्बाह-उल-हक याच्या नावावर मसूदपेक्षा जास्त पराभव आहेत. मिस्बाहच्या नेतृत्वात 56 कसोटी सामन्यांपैकी 19 सामन्यांत पाकिस्तानचा पराभव झाला होता.
बाबर आझमचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड
बाबर आझमचा कसोटी फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. त्याने यापूर्वी पाकिस्तानचे नेतृत्व करताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बाबरने 20 कसोटी सामन्यांत पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी 10 सामन्यांत विजय मिळवला, 6 सामन्यांत पराभव झाला, तर 4 सामने अनिर्णित राहिले. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला होता. याशिवाय बांगलादेश आणि श्रीलंकेत जाऊनही कसोटी मालिका जिंकल्या होत्या. कर्णधार असताना बाबरच्या फलंदाजीतही मोठी सुधारणा पाहायला मिळाली होती. त्याने 50 च्या सरासरीने 1,727 धावा केल्या, ज्यात 4 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
वेस्ट इंडिज मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), इमाम-उल-हक, अझान अवैस, अब्दुल्ला शफिक, फझल सुभान, आवैस अक्रम, शान मसूद, आगा सलमान, गाझी घोरी, सौद शकील, मोहम्मद रिझवान, अली उस्मान, साजिद खान, मोहम्मद अली, आमेर जमाल, मोहम्मद अब्बास, उबेद शाह आणि खुर्रम शहजाद.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना : 25 जुलै
दुसरा कसोटी सामना : 2 ऑगस्ट
हे ही वाचा –