DA Hike: सरकारी कर्मचार्‍यांवर आनंदसरी! दणकावून पगार वाढ, महागाई भत्ता इतका वाढणार – Marathi News | Good news for government employees DA hike from July 2026 7th vs 8th pay commission what is a update


महागाई भत्त्याची आनंदवार्ताImage Credit source: एजन्सी

DA Hike: केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात आणि पगारात मोठी वाढ होणार आहे. जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जवळपास 3 टक्क्याची वाढ होणार आहे. कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या औद्योगिक ग्राहक किंमत निर्देशांकातील (CPI-IW) आकडेवारीने ही बाब समोर आली आहे. वाढत्या महागाईत देशातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ

औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाचे आकडे समोर आले आहे. मे महिन्यात हा निर्देशांक वाढून 150.8 स्तरावर पोहचला. यापूर्वी एप्रिल महिन्यात हा आकडा 149.9 इतका नोंदवला गेला होता. महागाई वाढल्याने त्याचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर झाला आहे. मे महिन्यात महागाई दर गृहित धरल्यास महागाई भत्त्यात कमीत कमी 3 टक्क्यांची वाढ गृहित मानली जात आहे. सरकारने यापूर्वी डीएमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीला मंजूरी दिली होती. या निर्णयानंतर डीए 58 टक्क्यांहून थेट 60 टक्क्यांवर पोहचण्याची दाट शक्यता आहे.

नवीन वेतन आयोग कधी लागू होणार?

सरकारी कर्मचारी 8 व्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन वेतन आयोगाच्या शिपारसी पुढील वर्षाच्या अखेरीस येतील. पगारात वाढ दिसेल. जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा नवीन वेतन आयोग लागू करण्यात येईल. जर नवीन वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांना 18 ते 24 महिन्याची एकरक्कमी थकबाकी मिळेल. ही रक्कम मोठी असेल. जुलै 2026 च्या डीएचे गणित पाहता, तो सातव्या वेतनातंर्गत देण्यात येण्याची शक्यता आहे. यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंतच्या कालावधीसाठी थकीत डीए नसेल.

खात्यात कशी येईल थकबाकी?

मनीकंट्रोलच्या एका वृत्तानुसार, जुलै 2026 नंतर 7व्या वेतन आयोगातंर्गत डीएतील वृद्धी, 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होतील. जुलै 2026 मध्ये 7 व्या वेतन आयोगाच्या आधारे डीएमध्ये वाढ होईल आणि त्यानंतर सरकार 8 वा वेतन आयोग लागू करेल. तर यामधील जी तफावत आहे, ती सुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. या दोन्ही आयोगाच्या वेतन वाढीनुसार महागाई भत्त्याच्या तफावतीची जी थकबाकी असेल ती कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल. जुलै महिन्यातील डीएची औपचारिक घोषणा ऑक्टोबर महिन्यात, दिवाळीच्या काळात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *