365 दिवसांची वैधता, अनलिमिटेड डेटा; Vi चा नवीन रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या किंमत – Marathi News | Vi new recharge plan offers 365 day validity and Unlimited Data check the price


व्होडाफोन आयडियाने त्यांच्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक नवीन वार्षिक प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. कंपनी आधीपासूनच अनेक वार्षिक प्लॅन्स देत असली तरी हा नवीन 4 हजार 600 रुपयांचा प्लॅन लक्षवेधी ठरतोय. कारण या प्लॅनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात वापरकर्त्यांना अनलिमिटेड डेटा मिळत आहे. हा प्लॅन Vi च्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲपवर रिचार्जसाठी उपलब्ध आहे. चला तर या खास प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणते फायदे मिळतील ते जाणून घेऊयात.

4 हजार 600रूपयांच्या व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये मिळतील हे फायदे

Vi चा हा नवीन प्लॅन दररोज 100 एसएमएस, अमर्याद व्हॉईस कॉलिंग आणि अमर्याद डेटा देतो. व्होडाफोन आयडियाचा दावा आहे की हा अमर्याद डेटा आहे, पण तो पूर्णपणे अमर्याद नाही. यामध्ये दर 28 दिवसांसाठी 300 जीबी डेटाची मर्यादा आहे. वापरकर्त्यांना 5जी डेटा देखील मिळतो. लक्षात घ्या की 5जी डेटालाही तेच व्यावसायिक ‘फेअर युसेज पॉलिसी’ (FUP) लागू होते, जे दर 28 दिवसांसाठी 300 जीबी डेटाची परवानगी देते. त्यामुळे, तुम्ही 4जी वापरा किंवा 5जी, एफयूपी डेटा मर्यादा तीच राहते.

व्हीआयच्या 4 हजार 600 रूपयांच्या प्लॅनची वैधता

या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. याचा सरासरी दैनिक खर्च केला तर तो 12.60 रूपये इतका आहे. हा प्लॅन महाग वाटत असला तरी 28 दिवसांसाठी मिळणारा 300 जीबी डेटा खूपच आकर्षक आहे. जास्त किंमत असूनही या प्लॅनमध्ये कोणतेही अतिरिक्त फायदे मिळत नाहीत.

जिओच्या 365 दिवसांच्या प्लॅनची ​​किंमत किती आहे?

रिलायन्स जिओचा सर्वात महागडा प्लॅन, ज्याची किंमत 3 हजार 999 रूपये इतकी आहे, तो 365 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि यामध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच 28 दिवसांमध्ये एकूण 70 जीबी डेटा मिळतो. यासोबतच यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळते.

या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल, मोफत 50 जीबी क्लाउड स्टोरेज, 35,100 रुपये किमतीच्या गूगल जेमिनी प्रो चा ॲक्सेस ज्यामध्ये 5000 जीबी क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना सारखे फायदे मिळतात, असे काही अतिरिक्त लाभ देखील मिळतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *