30‍0 दिवसांची वैधता असलेला BSNL चा ‘हा’ स्वस्त रिचार्ज प्लॅन तुम्ही पाहिलात का? जाणून घ्या किंमत – Marathi News | Have you seen this affordable BSNL recharge plan with 300 days of validity Find out the price


भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) असलेली टेलिकॉम कंपनी त्यांच्या वापरकर्त्यांसाठी अनेक परवडणारे रिचार्ज प्लॅन्स सादर करत असते. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्लॅन शोधला आहे, जो 1 हजार 499 रूपयांच्या किंमतीमध्ये 300 दिवसांची वैधता देतो. जर तुमच्याकडे BSNL चे प्रीपेड सिम असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो, विशेषतः अशा वेळी जेव्हा रिचार्ज प्लॅन हे हळूहळू महाग होत आहे. हा प्लॅन केवळ उत्कृष्ट वैधताच देत नाही, तर FUP ​​मर्यादेसह अमर्यादित डेटादेखील देतो. चला तर मग आजच्या लेखात आपण बीएसएनएलच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.

या BSNL रिचार्ज प्लॅनमध्ये 300 दिवसांची वैधता, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड डेटा मिळतो. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार या प्लॅनमध्ये 32GB ची FUP मर्यादा आहे, म्हणजेच 32GB डेटा वापरल्यानंतर स्पीड लिमिट 40kbps पर्यंत कमी होईल. हा प्लॅन व्हाउचर फक्त प्रीपेड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

जर तुम्हाला तुमचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी जास्त वैधतेची आवश्यकता असेल तर कंपनीने अनेक परवडणारे रिचार्ज प्लॅन्स देखील लाँच केलेले आहेत. टेलिकॉमटॉकच्या एका अहवालानुसार बीएसएनएलने म्हटले आहे की, 1 हजार 499 रूपयांचा बीएसएनएल प्लॅन हा कंपनीच्या सर्वात लोकप्रिय प्लॅन व्हाउचर्सपैकी एक आहे. 1 हजार 499 रूपयांमध्ये मिळणारी 300 दिवसांची वैधता आणि फायदे पाहता, हा एक खूप चांगला सौदा ठरू शकतो. हे प्लॅन व्हाउचर्स वापरकर्त्यांना त्यांचे सिम सक्रिय ठेवण्यास मदत करतील.

जिओकडे दीर्घ मुदतीचा स्वस्त प्लॅन आहे का?

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह 1 हजार 748 रूपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 3600 एसएमएस, तसेच जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउड स्टोरेजचा समावेश आहे. मात्र हे लक्षात घेण्यासारखे आहे की डेटाचे फायदे मिळत नसतानाही हा प्लॅन बीएसएनएलच्या 1 हजार 499 रूपयांच्या प्लॅनपेक्षा महाग आहे. दुसरीकडे वैधतेच्या बाबतीत जिओचा प्लॅन उत्तम आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *