Post Office Schemes : दररोज 100 रुपयांची बचत पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा; तयार होईल 5 लाखांचा फंड, काय आहे योजना? – Marathi News | Post office recurring deposit scheme invest 3000 get 5 lakh rupees fund within 10 years


पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीमुळे शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या एका सुरक्षित योजनेची सर्वत्र चर्चा आहे. या लोकप्रिय योजनेला ‘नॅशनल सेव्हिंग्स डिपॉजिट अकाऊंट’ असे म्हटलं जाते. या योजनेत दिवसाला 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. तर महिन्याला 3000 रुपये जमा करू शकता. या योजनेतून सुरक्षितरित्या 5 लाखांहून अधिकचा फंड तयार होईल. या योजनेसाठी 6.7 टक्के इतका व्याजदार निश्चित करण्यात आला आहे. तसेच पैशांची गरज भासल्यास कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत वर्षाला 6.7 टक्के इतके व्याज दिले जात आहे. तुम्ही गुंतवणूक म्हणून महिन्याला 3000 रुपये किंवा दिवसाला 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. तर तुम्ही जमा केलेली रक्कम मुदतपूर्तीनंतर 3 लाख 60 हजार रुपये इतकी होईल. तर तुम्हाला योजनेत 1 लाख 52 हजार रुपये व्याज मिळेल. तुम्ही या योजनेत l0 वर्ष गुंतवणूक केल्यानंतर एकूण रक्कम 5 लाख 12 हजार 565 रुपये जमा होतील.

सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. भारतातील कोणताही नागरिक सिंगल किंवा जॉइंट अकाऊंट उघडू शकतो. तुम्ही योजनेत गुतंवणूक 100 रुपयांपासून सुरू होते. तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. जर तुम्हाला 10 वर्षांचं मूल असेल, त्याच्या नावानेही अकाऊंट उघडू शकता. त्यानंतर तुमचं मूल 18 वर्षांचं झाल्यावर KYC करून हे खाते प्रौढ खात्यात रुपांतरित केले जाऊ शकते.

आयुष्यात आर्थिक गरजा कधीही सांगून येत नाही. अशा परिस्थितीत योजनेच्या मुदतीच्या मध्यात रक्कम काढण्याची देखील सोय आहे. तुम्ही खाते उघडल्यानंतर सलग 12 हप्ते भरले असतील, तर तुम्ही ठेवीच्या 50 टक्क्यापर्यंत रक्कम कर्ज म्हणून काढू शकता. या योजनेत निश्चित केलेल्या आरडी व्याजदरापेक्षा 2 टक्के व्याज द्यावे लागेल. योजनेत कर्ज एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमध्ये फेडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जर तुम्ही कर्ज काढू फेडू शकला नाहीत, तर खात्याच्या फंडाच्या मुदतपूर्तीनंतर अंतिम फंडातून थकीत रक्कम कापली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *