मुंबई, दिल्ली किंवा तिरुपती, छ. संभाजीनगरहून रेल्वेनं कुठंही जावा, फक्त जादा पैसे मोजायची तयारी ठेवा, कितीनं महागलं तिकीट? | छत्रपती संभाजी नगर बातम्या


Last Updated:

Railway Update: छत्रपती संभाजीनगर येथून दिल्ली, मुंबई, हैदराबाद (सिकंदराबाद), तिरुपती आणि चेन्नई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. आता या शहरांत रेल्वेने जाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील.

मुंबई, दिल्ली किंवा तिरुपती, छ. संभाजीनगरहून कुठंही जावा, फक्त जादा पैसे मोजायची तयारी ठेवा, रेल्वेचं तिकीट महागलं, नवे दर किती?
मुंबई, दिल्ली किंवा तिरुपती, छ. संभाजीनगरहून कुठंही जावा, फक्त जादा पैसे मोजायची तयारी ठेवा, रेल्वेचं तिकीट महागलं, नवे दर किती?

छत्रपती संभाजीनगर: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून आता प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे विभागाकडून नुकतेच प्रवासी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून राज्यात आणि राज्याबाहेर जाणाऱ्या रेल्वेच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. 1 जुलैपासून ही भाडेवाढ लागू झाली असून प्रवाशांना 20 ते 50 रुपयांपर्यंत जादा पैसे मोजावे लागतील.

छत्रपती संभाजीनगर येथून दिल्ली, मुंबई, हैदराबाद (सिकंदराबाद), तिरुपती आणि चेन्नई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेच्या स्लीपर क्लासपासून ते वातानुकूलित श्रेणीपर्यंतच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांनाही या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. कारण जनरल तिकीट दरातही 10 ते 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

विशेष रेल्वेचे तिकीट दर जादा राहणार

छत्रपती संभाजीनगर येथून विशाखापट्टणम, विजयवाडा, चेन्नई, हजरत निजामुद्दीन आदी ठिकाणी विविध साप्ताहिक रेल्वे धावतात. या एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांना नवीन भाडेवाढ लागू असेल. याशिवाय सणासुदीला आणि सुट्ट्यांच्या काळात देखील विशेष रेल्वे धावतात. त्या गाड्यांचे तिकीट दर हे या नियमित भाडेवाढीपेक्षा जास्त राहणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जुने आणि नवे तिकीट दर

छत्रपती संभाजीनगर ते नवी दिल्ली रेल्वेला पूर्वी स्लीपरसाठी 645 रुपये तिकीटदर होते. आता त्यासाठी 670 रुपये मोजावे लागतील. तसेच थ्री एसीसाठी 1680 ऐवजी 1710, टू एसीसाठी 2390 ऐजी 2420, फर्स्ट एसीसाठी 4035 ऐवजी 4065 रुपये मोजावे लागतील. संभाजीनगर ते तिरुपती गाडीला स्लीपरला 545 ऐजी 590, थ्री एसी 1450 ऐवजी 1530 आणि टू एसीला 2075 ऐवजी 2180 रुपये तिकीट असेल. या गाडीला फर्स्ट एसी नाही.

संभाजीनगर ते सिकंदराबाद गाडीला स्लीपरसाठी 320 ऐजी 330, थ्री एसी 855 ऐवजी 880, टू एसीला 1215 ऐवजी 1240 आणि फर्स्ट एसीसाठी 2010 ऐजी 2045 रुपये मोजावे लागतील. तर संभाजीनगर मुंबईसाठी स्लीपर 245 ऐवजी 255, थ्री एसीला 665 ऐवजी 710, टू एसी 920 ऐवजी 930 आणि फर्स्ट एसीला 1535 ऐजी 1545 रुपये द्यावे लागतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *