Weekly Horoscope 6 To 12 July 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिना अनेकांसाठी गेमचेंजर ठरणार आहे, ज्यामुळे दुसरा आठवडा हा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) – या आठवड्यात नात्यात पारदर्शकता ठेवा. जोडीदारासोबत भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. अविवाहितांना प्रेमप्रकरणात सकारात्मक संकेत मिळतील.
करिअर (Career) – करिअरच्या बाबतीत नवीन प्रकल्पात यश मिळेल. नोकरीत बढती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. व्यवसायात नवीन भागीदारीचा विचार करू शकता.
आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, उत्पन्नात वाढ होईल, परंतु खर्चही वाढू शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा आठवडा अनुकूल आहे.
आरोग्य (Health) – डोकेदुखी, थकवा किंवा झोपेचा त्रास जाणवू शकतो. नियमित दिनचर्या पाळा आणि स्क्रीन टाइम कमी करा.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) – प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो. अविवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
करिअर (Career) – या आठवड्यात नोकरीत तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगतीचा काळ आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. बचतीवर भर द्या आणि अनावश्यक कर्ज घेणे टाळा.
आरोग्य (Health) – आठवड्यात आरोग्य चांगले राहील. मात्र पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून सावध राहा. पौष्टिक आहार आणि नियमित चालण्याची सवय लाभदायक ठरेल.
हेही वाचा :
Lord Shiv: शिवलिंगासमोर भाविक 3 टाळ्या का वाजवतात? काय आहे यामागील महत्त्व, शास्त्र अन् फायदे? जाणून व्हाल थक्क…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)