Aamir Khan Marriage : घराला लायटिंग, बसायला खुर्च्या, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नात तामझाम काय? पहिला व्हिडीओ समोर; नवरी… – Marathi News | Actor aamir khan going to marry gauri spratt preparation started first video came out


Aamir Khan Marriage : प्रसिद्ध अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करतोय. येत्या 5 जुलै रोजी आमिर खानच्या घरीच हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आमिर खानने स्वत:च याबात माहिती दिली आहे. आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट बऱ्याच दिवसांपासून एकमेकांच्या रिलेशनमध्ये होते. हे दोघे अनेकदा एकत्र दिसलेले आहेत. गुरुवारी मुंबईत प्रीतम अँड पेड्रो चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान आमिर खानने मी लग्न करत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता या विवाहसोहळ्याची जोमात तयारी केली जात आहे. विवाहासाठी लागणारे सामान आमिर खानच्या घरी आणले जात आहे. याचे काही व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

आमिर खानचे लग्न कुठे होणार?

मुंबईतील पाली हिल येथे आमिर खानचा एक फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्येच आमीर खानचा विवाह सोहळा पार पडणार आहे. विशेष विवाह कायद्यानुसार हा विवाह होईल. या विवाहासाठी आमिर खानचे घर सजवले जात आहे. त्याच्या घरावर रोषणाई केलेली दिसत आहे. दुसरीकडे खुर्च्या आणि इतर सामानही बाहेरून आणले जात आहे.

बहीण पोहोचली, 150 पाहुणे येणार

सध्या मुंबईत तुफान पाऊस चालू आहे. गरज असेल तरच बाहेर पडा असा इशारा देण्यात आलेला आहे. दुसरीकडे आमिर खान स्वत:च्याच घरी घरी अगदी साध्या पद्धतीने विवाहबद्ध होत आहे. वरुणराजादखील या जोडीला आशीर्वाद देत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या विवाहात सहभागी होण्यासाठी आमिर खानची बहीण त्याच्या घरी पोहोचली आहे. या सोहळ्याला मोजकेच 100 ते 150 पाहुणे बोलावले जाणार आहेत. खूपच जवळच्या लोकांना, मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आमिरने आमंत्रित केले आहे.

विवाहाला कोण कोण हजर राहणार?

या विवाह सोहळ्यात नेमके कोण-कोण हजेरी लावणार हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर, दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे या लग्नाला हजर राहण्याची शक्यता आहे. आमिर आणि गौरीचा विवाह सोहळा नेमका कसा असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *