Budh Gochar 2026 : 7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा


Budh Gochar 2026 : द्रिक पंचांगानुसार, 7 जुलै रोजी बुद्धी, तर्क आणि व्यवसायाचा कारक बुध ग्रह आपली स्वराशी म्हणजेच मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. मिथुन राशीत बुधाचा प्रवेश अनेक राशींसाठी शुभकारक आणि भाग्यशाली ठरणार आहे. या संक्रमणाने काही राशींच्या करिअरमध्ये प्रगती पाहायला मिळेल. धनलाभ होईल. तसेच, समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. बुधाच्या या राशी परिवर्तनाने कोणत्या राशींचे चांगले दिवस सुरु होतील हे जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

बुध ग्रहाचं संक्रमण मिथुन राशीच्या प्रथम स्थानी होणार आहे. या काळात तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली दिसून येईल. तसेच, तुमच्या वागण्याने लोक प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती दिसून येईल. तसेच, मानसिक तणावातून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमच्या सकारात्मक ऊर्जा दिसेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

बुध ग्रहाच्या संक्रमणाचा सिंह राशीवर देखील परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण कराल. तसेच, जर तुम्ही व्यवसायिक असाल तर तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. भावा-बहिणीतील संबंध चांगले असतील. समाजात तुमची चांगली प्रतिमा निर्माण होईल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

या राशीच्या दहाव्या स्थानी बुध ग्रह मार्गी होणार आहे. हा काळ तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची संधी आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

बुध ग्रहाचं संक्रमण या राशीच्या लोकांसाठी भाग्याचं ठरणार आहे. या राशीच्या नवव्या चरणात हे संक्रमण होणार आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. धनसंपत्तीची भरभराट होईल. तसेच, तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला नफा मिळेल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा फायद्याचा की तोट्याचा? 6 पैकी 5 राशींना लॉटरी; साप्ताहिक राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *