Broom Vastu : घरातील जुना झाडू फेका; आयुष्यात होतील चमत्कारीक बदल, फक्त 3 चुका टाळा – Marathi News | Vastu tips in marathi broom placement and changes rules zadu badlnyache niyam latest marathi news


Broom Vastu : सनातन धर्म आणि वास्तू शास्त्रात झाडू केवळ घरातील धूळ, कचरा साफ करण्याची वस्तू मानली जात नाही. तर झाडूला महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. काही जण घरातील झाडू खराब झाल्यानंतरही फेकून देत नाहीत. परंतु तुमची एक छोटीशी चूक आर्थिक अडचणींचे मुख्य कारण ठरू शकते. घरात झाडू चांगला असेल तर घरात साफसफाई चांगली होत असेल, घरात सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे घरातील सदस्यांना सुख-समृद्धी लाभते.

वास्त्रू शास्त्रानुसार, खरंतर झाडू कोणत्याही दिवशी फेकू नये. झाडू फेकण्यासाठी विशेष तारीख आणि वेळ निवडली पाहिजे. चुकीच्या दिवशी झाडू फेकल्याने त्याचे नकारात्मक परिणाम जाणवतात. त्यामुळे झाडू विशिष्ट दिवशीच फेकायला हवा.

शनिवार : झाडू बदलण्यासाठी शनिवारचा दिवस सर्वाधिक शुभ मानला जातो. शनिवारी घरात नवीन झाडू आणल्याने घरातील नकारात्मकता दूर जाते.

अमावस्या : अमावस्याच्या दिवशी नवीन झाडू घरात आणणे शुभ मानले जाते. या व्यतिरिक्त शुक्ल पक्ष, एकादशी, शुभ नक्षत्रच्या दिवशी झाडू खरेदी करणे चांगले मानले जाते.

जुना झाडू कधी बदलावा?

जुना झाडू खराब होऊ लागला. त्याचा हँडल तुटण्यास सुरुवात झाली असेल, तर झाडू बदलायला हवात. कारण तुटलेला झाडू घरात वापरल्याने घरात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते.

कोणत्या चुका टाळाव्यात?

झाडू कधीही घराच्या मुख्य दरवाजाच्या मागे ठेवू नये. घरी आलेल्या पाहुण्यांना सहज झाडू दिसणार नाही, त्या ठिकाणी झाडू ठेवायला हवा.सायंकाळ झाल्यानंतर झाडू मारणे टाळले पाहिजे, असे केल्याने घरातील लक्ष्मी दूर जाते. कुटुंबातील सदस्यांना पैशांची कमतरता भासते. वास्तू शास्त्रानुसार, झाडू नेहमी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावा. यामुळे घराती वास्तू दोष दूर जातात. तुम्ही एखादा झाडू नवीन विकत घेतला असेल, तर तो शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी वापरण्यास काढावा.

Disclaimer: लेखातील माहिती केवळ प्राथमिक स्वरुपाची असून या माहितीला समर्थन देत नाही. तसेच आमचा लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही. लेखातील माहितीच्या आधारे निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *