केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अगोदरच याबाबत घोषणा होईल. यादरम्यान काही प्रस्तापित चेहऱ्यांना मोठा धक्का बसणार असून त्यांना थेट मोदींच्या कॅबिनेटमधून नारळ मिळेल. विशेष म्हणजे काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला केंद्रात तीन मंत्रिपदे मिळणार असल्याचे बोलले जातंय. यासोबतच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यी पदोन्नती होणार असल्याचेही सांगितले जातंय. नितीन गडकरी यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी नरेंद्र मोदी टाकू शकतात. खांद्ये पालटही होईल. याबाबत दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यातील काही नेत्यांना थेट केंद्रात स्थान मिळू शकते. लवकरच कॅबिनेटचा विस्तार होईल. नुकताच भाजपाचे अध्यक्ष नितिन नवीन आणि अमित शाह यांच्यात महत्वाची बैठक झाली.
ही बैठक तब्बल 3 तास सुरू होती. पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होईल. अर्थमंत्री, रेल्वे मंत्री याबाबत काही मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. श्रीकांत शिंदे यांचा थेट केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, तशी सूत्रांची माहिती आहे. ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्याही गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडू शकते.
मिडिया रिपोर्टनुसार, बीजेपीची नवीन टीम जवळपास तयार आहे. नुकताच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त नितिन गडकरी हेच नाही तर अमित शाह यांचेही पदोन्नती होण्याचे संकेत आहेत. अमित शाह यांना उपप्रधानमंत्रीही बनवले जाऊ शकते. याबाबत तब्बल काही तास बैठकही झाली. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका ध्यानात ठेऊन निर्णय घेतले जात आहेत.
राघव चड्ढा यांनाही मंत्रिपद मिळू शकते. पंजाब विधानसभा निवडणुका असून त्यात भाजपाचा महत्वाचा चेहरा म्हणून राघव चड्ढा याच्याकडे बघितले जाते. इतकी वर्ष राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीचे काम करत होते. त्यानंतर त्यांनी मोठी बंडखोरी पक्षातून केली. या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्याही पदरात काही महत्वाची खाती पडू शकतात, असा अंदाज आहे.