Sagar Karande Post On Anushree Mane: अनुश्रीनं घर घेताच सागर कारंडे आवर्जून भेटला; बिग बॉसच्या घरातलं गोड नातं टिकवत केली खास पोस्ट; VIDEO


Sagar Karande Post For Anushree Mane:  बिग बॉस मराठीच्या 6 व्या (Bigg Boss Marathi 6 ) सीझनमध्ये दिसलेली स्पर्धक अनुश्री माने (Anushree Mane) गेल्या काही दिवसांपासून तिच्या स्वतःच्या नव्या घरामुळे चर्चेत होती. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये अभिनेत्री अनुश्री माने हिने स्वतःच्या घरात गृहप्रवेश केला. नवीन घराची पूजा केली.तिच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रसंगी अनेक मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.यात बिग बॉस मराठीच्या घरातील काही स्पर्धकही उपस्थित होते.रुचिता जामदार तन्वी कोलते, विशाल कोटिअन, प्रभू शेळके, धनंजय पोवार ही सगळी मंडळी हजर होती. पण सध्या सागर कारंडेने (Sagar Karande) अनुश्रीचं कौतुक करणारी सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनुश्री च्या नव्या घरी सागर गेला. तिचं भरभरून कौतुक केलं. नंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याने अनुश्रीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर चाहते सागरचं मनापासून कौतुक करताना दिसत आहेत. 

अनुश्री मानेसाठी सागरची खास पोस्ट

मनोरंजनसृष्टीत हातचं राखून मैत्री करणारे बरेच असतात. पण काही जण त्यातही मनापासून कौतुक करणारी ही असतात. बिग बॉस मराठीच्या घरात एकमेकांसमोर स्पर्धक म्हणून असलेले सागर कारंडे आणि अनुश्री माने यांची मैत्री घराबाहेरही आहे . अलीकडेच अनुश्रीने स्वतःचं नवं घर घेतलं. त्यानंतर सागर कारंडे तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. नव्या घरातील अनुश्री शी बोलतानाचा, खळखळून हसतानाचा एक व्हिडिओ शेअर करत सागर कारंडेने अनुश्री साठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. 

या व्हिडिओमध्ये सागर अनुश्रीच्या घरी आल्यानंतर, ती ‘तुमचे स्वागत आहे ‘ असं म्हणताना दिसते. नंतर ती पाया पडते.दोघेही एकमेकांशी मनमोकळेपणाने भेटतात.सागर अनुश्रीच्या आईला म्हणतो ‘बघितलं पोरीने घर घेतलं ..त्यावर तिची आई हो म्हणते. तनुश्री च्या घरातील व्हिडिओ शेअर करत सागरने आपल्या भावना ही व्यक्त केल्या आहेत.

 तो म्हणाला ‘स्त्रीनं ठरवलं तर ती अख्ख जग जिंकू शकते म्हणतात .माझ्या या पोरीने इतक्या परिश्रमांना स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करून यावर शिक्कामोर्तब केलंय . प्रयोगांच्या व्यग्रतेत पोस्ट करायला जरा उशीर झाला असला तरी वेळेत पोहोचून तिच्या आनंदात सहभागी होता आला याचं समाधान आहे . असं सागरने लिहिलं आहे. या पोस्टमुळे बिग बॉसच्या घरातलं गोड नातं आजही तसंच कायम आहे हे चाहत्यांना प्रचंड आवडलंय. 

सागरच्या पोस्टवर अनेक जण त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिलं ‘दादा तू खूप डाऊन टू अर्थ आहेस.खरच खूप छान.’ अनेकांनी बिग बॉसमधील टोळी गँगच जबरदस्त होती.काटा ग्रुप फक्त नावापुरता होता.जिंकण्यासाठी मतलबी म्हणून खेळला. ‘असेही काहींनी म्हटलं. दुसऱ्या एकाच्या हाताने म्हटलं ‘सागर दादा काय बोलणार आता ..तू माणूसच खूप भारी आहेस .सागर नाव खरंच शोभतं .’

सागर कारंडेच्या कामाविषयी ..

सागर कारंडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, तो सध्या ‘शिक्कामोर्तब ‘ नावाचं नाटक करतोय. मराठी रंगभूमी चित्रपट टीव्ही या तिन्ही आघाड्यांवर विनोदाच्या अचूक टायमिंग न स्वतंत्र ओळख निर्माण करणारा अभिनेता सागर कारंडे फु बाई फु आणि चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचला.त्याच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं तो कायम जिंकत आलाय. अलीकडच्या काळात बिग बॉस मराठीच्या मंचावरून त्याने त्याची एक वेगळी बाजू ही प्रेक्षकांना दाखवली. सागर कायम त्याच्या कामाविषयी, एखादा चांगला प्रसंग, अनुभव प्रेक्षकांची शेअर करताना दिसतो.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *