FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लान – Marathi News | FIFA World Cup 2026 Round of 16 England secret plan before facing Mexico learned a lesson from Ecuador


FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लानImage Credit source: GETTY IMAGES

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील राउंड ऑफ 16 म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. या फेरीत इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सामना मेक्सिकोत खेळला जाणार आहे. त्यामुळे इंग्लंड संघाने मैदानाबाहेरीला आव्हानांवर मात करण्यासाठी एक सिक्रेट प्लान आखला आहे. मागच्या आठवड्यात राउंड ऑफ 32 मध्ये मेक्सिकोचा सामना इक्वोडोरशी झाला होता. या सामन्याआधी स्थानिक चाहत्यांनी इक्वाडोरच्या खेळाडूंना झोपू दिलं नव्हतं. मेक्सिसन चाहत्यांनी इक्वाडोरचे खेळाडू थांबलेल्या हॉटेलबाहेर लाउडस्पीकर, हॉर्न आणि मोटरसायकलच्या आवाजाने त्यांना त्रास दिला होता. त्यामुळे खेळाडूंची झोप मोड झाली आणि त्याचा परिणाम सामन्यावर झाला. या सामन्यात पराभूत होत स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर संघाने याची तक्रार फिफाकडे केली. इक्वाडोरची स्थिती पाहून इंग्लंडने आता एक सिक्रेट प्लान आखला आहे.

मेक्सिकोशी सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लान

फिफा वर्ल्डकप 2026 राउंड ऑफ 16 चा सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ मेक्सिको सिटीत येणार असून इक्वाडोरला झालेल्या त्रासातून बरंच काही शिकला आहे. यासाठी एक सिक्रेट प्लान आखला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, इंग्लंडचा संघ मेक्सिकोत दाखल होणार आणि त्यांच्या हॉटेलचं नाव गुप्त ठेवलं गेलं आहे. इतकंच काय खेळाडूंना पुरेशी झोप मिळावी यासाठी एक खास प्लान आखला आहे. ज्या खेळाडूंकडे ईयर प्लग किंवा स्लीप बँड नाहीत, त्यांना मॅनेजमेंटकडून झोपेची औषधं दिली जाणार आहेत.

मॅक्सिकन चाहत्यांचा मागच्या सामन्यापूर्वीचा धुडगूस पाहून खेळाडूंच्या खोल्यांना व्हाइट नॉइज ऑडियो मशिन लावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या झोपेत कोणताही खंड पडणार नाही. इंग्लंड हेड कोच थॉमस ट्यूशेल यांनी या रणनितीसह नशीबावरही बोट ठेवलं आहे. यावेळी त्यांनी 1986च्या वर्ल्डकप स्पर्धेचा उल्लेख केला. यात अर्जेंटीनाच्या डिएगो माराडोनाने एज्टेका स्टेडियममध्ये हँड ऑफ गॉड म्हणजेच हाताने बॉल नेटमध्ये ढकलला होता. त्यामुळे खेळ भावनेला ठेच लागली होती. त्यामुळे इंग्लंडचा संघ बाहेर गेला होता. मात्र 40 वर्षानंतरही इंग्लंडचा संघ त्याच मैदानात परत खेळणार आहे. मेक्सिको इंग्लंड यांच्यातील सामना 6 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 5.30 वाजता होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *