Khashaba Political Peson Entry: ‘खाशाबा’ सिनेमात माजी खासदाराची एंट्री; नेटीझन्सने लगेचंच ओळखलं, संभाजीराजे म्हणाले, ‘ हा रोल’ माझ्यासाठी..


Khashaba Film Political Person Role: ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’सारख्या चित्रपटांनी मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळाच बेंचमार्क सेट केला. बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्येही तुफान कमाई आणि महाराष्ट्रभरातून दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. नागराज मंजुळे( Nagraj Manjule) यांच्या ‘खाशाबा’या (Khashaba) चित्रपटाचा टिझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. स्वतंत्र भारताला पहिलं पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्रातल्या मातीतले कुस्तीवीर खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या आयुष्यावर आधारलेला हा बायोपिक सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, छाया कदम,गिरीश कुलकर्णी,गार्गी कुलकर्णी, पहिलवान संग्राम सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र, चित्रपटाच्या टिझरमध्ये अवघ्या काही सेकंदासाठी एक राजकीय वर्तुळातील व्यक्ती झळकली. या व्यक्तीची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. पाठमोरी आकृती असली तरी लोकांनी क्षणार्धात ही व्यक्ती कोण आहे याचा अंदाज बांधलाय.

‘खाशाबा’ चित्रपटात माजी खासदाराची एन्ट्री

नागराज मंजुळे यांचा खाशाबा चित्रपटातील टिझरमध्ये झळकलेली ही व्यक्ती म्हणजे माझी खासदार संभाजीराजे भोसले यांची आहे. कोल्हापूरच्या मातीतील रांगड्या ‘खाशाबा’ जाधवांच्या या बायोपिकमध्ये अवघ्या काही सेकंदांसाठी माझी खासदार संभाजी राजे भोसले यांनी भूमिका साकारली. एवढेच नाही तर x माध्यमावर टिझर शेअर करत हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या पूजनीय व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचे सांगत त्यांनी एक पोस्ट केलीय. या पोस्टची ही सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

 

गुरुवारी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. खाशाबा’च्या टीझरमध्ये पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचं भव्य चित्रण, लाल मातीतील झुंज, संघर्षाची तीव्रता आणि सिनेमाचा मोठा आवाका प्रभावीपणे पाहायला मिळतो. कोल्हापूरच्या मातीत घडलेला आणि महाराष्ट्रासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *