एसजीएसतर्फे मुंबईत ‘द नेक्स्ट डिकेड ऑफ सोशल इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह’चे आयोजन; भूजल संवर्धनासाठी ‘जल संकल्प’चा शुभारंभ


मुंबई: एसजीएसतर्फे मुंबईत “द नेक्स्ट डिकेड ऑफ सोशल इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह” चे आयोजन करण्यात आले. ही कॉर्पोरेट अग्रणी, सीएसआर क्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योग तज्ज्ञांची निमंत्रितांसाठीची परिषद होती. ‘कॅपिटल, क्रेडिबिलिटी अँड कोलॅबोरेशन’ या विषयावर आधारित या आयोजनात भांडवली बाजार, उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि तळागाळातील प्रशासनाशी संबंधित प्रतिनिधी एकत्र आले, जेणेकरून भारतातील सामाजिक परिणाम आणि जबाबदार व्यवसायाच्या भविष्याला दिशा देता येईल.

या आयोजनाचा केंद्रबिंदू ठरला ‘जल संकल्प’ चा शुभारंभ भूजल संवर्धन आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठीची एक बहु-भागधारक प्रतिज्ञा. भारत आपल्या अत्यंत महत्त्वाच्या विकासात्मक आव्हानांपैकी एकाला सामोरे जात असताना, या उपक्रमाचा उद्देश कॉर्पोरेट, प्रशासकीय आणि सामुदायिक भागधारकांना मोजता येण्याजोग्या, प्रत्यक्ष जमिनीवरील जलसंवर्धनासाठी एका व्यासपीठावर आणणे हा आहे.

दुपारच्या सत्राची सुरुवात विनीत शास्त्री, एव्हीपी, सोशल स्टॉक एक्सचेंज व लिस्टिंग्ज (मेनबोर्ड), नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्या प्रमुख भाषणाने झाली, ज्यामध्ये त्यांनी सोशल स्टॉक एक्सचेंज कशा प्रकारे सीएसआरची पुनर्कल्पना करत आहे हे विशद केले. त्यानंतर ‘मेझरिंग इम्पॅक्ट: द नेक्स्ट फ्रंटियर इन सोशल अकाउंटेबिलिटी’ या विषयावर तज्ज्ञांची परिचर्चा झाली, ज्यात प्रीती सावला (सेंट्रल काउन्सिल मेंबर, आयसीएआय), मेबल अब्राहम (हेड ऑफ सीएसआर, एल अँड टी), कृपा टन्ना (सीएसआर लीड, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस) आणि प्रा. पेखम बासू (टिस) सहभागी झाल्या. या परिचर्चेचे सूत्रसंचालन एसजीएस इंडियामधील हेड सीएसआर स्ट्रॅटेजी अँड इम्पॅक्ट सर्व्हिसेस, चिंतनसिंह सुरतिया यांनी केले.

या उद्देशाची निकड तळागाळात कार्यरत वरिष्ठ जिल्हा प्रशासकांनी अधिक स्पष्ट केली. यामध्ये श्रीमती श्रीरूपा, आयएएस (चामराजनगर, कर्नाटक) आणि कीर्ती किरण पुजार, आयएएस (धाराशिव, महाराष्ट्र) यांचा समावेश होता. त्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील जलसुरक्षा, शेती आणि सामुदायिक सक्षमतेबाबतचे अनुभव मांडले.

‘जल संकल्प’ च्या शुभारंभाचा भाग म्हणून, एसजीएस ने जिल्हा प्रशासन, चामराजनगर, कर्नाटक सरकार यांच्यासोबत एक सामंजस्य करारही केला, ज्याचा उद्देश ‘चामराजनगर वॉटर स्टीवर्डशिप अलायन्स’ च्या निर्मिती व संवर्धनास पाठबळ देणे हा आहे. या सहकार्याचे उद्दिष्ट भागधारकांचा सहभाग, बहु-क्षेत्रीय सहभागिता तसेच तांत्रिक ज्ञान आणि सीएसआर सहाय्य सक्षम करून जिल्हाभरातील भूजल व्यवस्थापन आणि जलसुरक्षा उपक्रम बळकट करणे हे आहे.

या प्रसंगी बोलताना, अमित ठक्कर, मॅनेजिंग डायरेक्टर, एसजीएस (इंडिया, बांगलादेश अँड श्रीलंका) म्हणाले की,
“सामाजिक परिणामाचे पुढील दशक हे आपण किती देतो यावरून नव्हे, तर आपण घडवलेला बदल किती विश्वासार्हपणे मोजू आणि टिकवू शकतो यावरून ठरेल. ‘जल संकल्प’ च्या माध्यमातून सामायिक संकल्पाचे रूपांतर सामायिक व चिरस्थायी परिणामात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण आज जपलेला प्रत्येक थेंब उद्याचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करतो.”

एसजीएस विषयी

एसजीएस ही जगातील अग्रगण्य परीक्षण, निरीक्षण आणि प्रमाणन कंपनी आहे. जी ११५ देशांमध्ये २,५०० हून अधिक प्रयोगशाळा व व्यावसायिक केंद्रे चालवते, ज्यांना १,००,००० समर्पित व्यावसायिकांच्या संघाचे पाठबळ आहे. १४५ वर्षांहून अधिक सेवा-उत्कृष्टतेसह, स्विस कंपन्यांचे वैशिष्ट्य असलेली अचूकता व सुस्पष्टता एकत्र करून आम्ही संस्थांना गुणवत्ता, अनुपालन आणि शाश्वततेच्या सर्वोच्च मानकांपर्यंत पोहोचण्यास मदत करते.

‘जल संकल्प’ विषयी

‘जल संकल्प’ हा एसजीएस इंडियाचा उपक्रम आहे. भूजल संवर्धन आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठीची एक बहु-भागधारक प्रतिज्ञा, जिचा शुभारंभ “द नेक्स्ट डिकेड ऑफ SOCIAL इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह” मध्ये करण्यात आला.

आणखी वाचा 

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण सुरूच, प्रति 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये; जाणून घ्या सोने-चांदीचा ताजा भाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *