शाळा परिसरात ‘स्टिंग’ बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल


मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने पाहायला मिळत आहेत. त्यातच, राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या धडाडीच्या कारवाईचं कौतुक होत असून आज स्वत: तुकाराम मुंढे देखील विधानभवन परिसरात दिसून आले. त्यातच, राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी करण्यात आली असून शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंग विक्रीसाठी बंदी करण्याचे निर्देश मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले. याबाबत, आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 

स्टिंग हे स्वस्त एनर्जी ड्रिंक आहे, त्यामागे एक टिप्पणी आहे, त्या लेबल्सची ही प्रिंट आहे. त्यानुसार, लहान मुलांना हे दिले नाही पाहिजे, हे कंपनी मान्य करते. पण, शाळेच्या आसपास हे मिळते, त्याला आक्षेप घेण्याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅफेन आहे. 32 एमजी कॅफेन त्यात आहे, 400 एमजी कॅफेनची प्रौढ लोकांना परवानगी आहे. त्यामध्ये टोरेन सुद्धा आहे, साखरेचे प्रमाण 34 टक्के आहे, कॅफेन हे हार्ट बीट वाढवते. टोरेन हे स्टेबिलायझरसारखे काम करते, हे एनर्जीसारखे वाटते. पण, ते घेतल्यानंतर थोड्यावेळा शरीर फॉल डाऊन वाटते, म्हणून पुन्हा ड्रिंक घेतले जाते, अशी माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली. 

मंत्र्‍यांनी उत्तर दिले, आता शाळा परिसरात विक्री नाही

स्टिंग हे 2 पेक्षा जास्त ड्रिंक एका दिवसात घेता कामा नये, त्यामुळे थेट मृत्यू होत नसला तरी हृदयाचा धोका वाढतो. त्यातूनच डायबेटिस लहान मुलांना होत आहे, मुले आधीन जात आहेत, अशा एनर्जी ड्रिंकमुळे मुले अंमली पदार्थांकडे वळतात, मंत्र्यांनी मला उत्तर दिले. त्यानुसार, शाळेपासून 500 मीटर परिसरात आता स्टिंगची विक्री करता येणार नाहीत, विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही विक्रम पाचपुते यांनी सांगितले. आयुक्त तुकाराम मुंढेंचे सर्व कौतुक करतात, ते कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे? मुळात हे ड्रिंक लहान मुलांना विकता कामा नये. मात्र,  त्याची अंमलबजावणी होत नाही. मी सरकारकडे ही मागणी करणार आहे, स्टिंग हे दारुपेक्षा ही घातक आहे, असा माझा वैयक्तिक दावा आहे, असे देखील आमदार पाचपुते यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. 

हेही वाचा

Tukaram Mundhe In Vidhanbhavan Sting Energy Drink: स्टिंग एनर्जी ड्रिंकवरुन चर्चा, तुकाराम मुंढेंची विधानभवनात एन्ट्री; नरहरी झिरवळांनी थेट आदेश देऊन टाकले!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *