Team India Test tour of Sri Lanka Schedule : भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळेल. यानंतर, ऑगस्ट 2026 मध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून तिथे दोन महत्त्वाचे कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या कसोटी मालिकेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. 26 जुलै रोजी झिम्बाब्वे मालिका संपल्यानंतर 15 ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होईल. श्रीलंका क्रिकेटने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंका दौऱ्यावर येणार आहे. हे दोन्ही सामने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (WTC) 2025-27 च्या सायकलचा भाग आहेत. भारतीय संघाची सध्याची स्थिती पाहता हे दोन्ही सामने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
WTC 2025-27 च्या गुणतालिकेची स्थिती
भारतीय संघाने आतापर्यंत दोनदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत धडक मारली आहे, परंतु दुर्दैवाने एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर श्रीलंका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेनंतर भारत चालू वर्षाच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा देखील करणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये मालिका 2-2 अशी ड्रॉ (बरोबरीत) सोडवली होती आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका जिंकून चांगली सुरुवात केली आहे.
Mark your calendars 🗓️
Presenting #TeamIndia‘s schedule for the two-match Test series against Sri Lanka, starting August 15 🙌#SLvIND pic.twitter.com/FoUEaUb3Qe
— BCCI (@BCCI) July 2, 2026
फिरकीपटूंचे आव्हान
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेने भारताला त्यांच्याच मायभूमीत पराभूत केले होते, ज्यावरून भारतीय फलंदाजांच्या फिरकी (Spin) खेळण्याच्या क्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे श्रीलंकेचे फिरकीपटू त्यांच्या घरच्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांसमोर कठीण आव्हान उभे करू शकतात. भारताने यापूर्वी 2017 मध्ये कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा केला होता, ज्यामध्ये भारताने 3-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला होता.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेचे वेळापत्रक (Team India Test tour of Sri Lanka Schedule)
- पहिली कसोटी – 15 – 19 ऑगस्ट 2026 – गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम
- दुसरी कसोटी 23 – 27 ऑगस्ट 2026 – कोलंबो SSC
हे दोन्ही कसोटी सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 10:00 वाजता सुरू होतील. सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी 9:30 जता टॉस (नाणेफेक) होईल.
हे ही वाचा –