रस्त्याने जाताना झाला घात; किराणा दुकानात जाणाऱ्या महिलेसोबत भयंकर घडलं; नागपूर हादरलं | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

महानगरपालिकेचे कंत्राटदार आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे एका निष्पाप वृद्धेला आपला जीव गमवावा लागला आहे.

nagpur
nagpur

नागपूर: नागपूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्याने रस्त्याने साचलेल्या पाण्यातून विजेचा जोरदार झटका लागून एका 65 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नागपुरात समोर आली आहे. महानगरपालिकेचे कंत्राटदार आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे एका निष्पाप वृद्धेला आपला जीव गमवावा लागला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री नागपूरच्या ताजबाग परिसरातील गौसिया कॉलनीत घडली आहे. अफरोजा बेगम (वय 65) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या एका भाड्याच्या घरात एकट्याच राहत होत्या. बुधवारी रात्री अफरोजा बेगम या जवळच्या किराणा दुकानातून सामान घेऊन आपल्या घरी परतत होत्या. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून जात असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

आर्थिक भरपाई देण्याची मागणी

अफरोजा बेगम यांचा मृत्यू झाला त्यावेळी तिच्या शरीरात विजेचा प्रवाह वाहत होता असे स्थानीय रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच पीडितेचे कुटुंबाला आर्थिक भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे.

प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि नागरिकांचा संताप

महानगरपालिकेच्या कंत्राटदाराचे काम करताना झालेले अक्षम्य दुर्लक्ष आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हेळसांडपणा या मृत्यूला सर्वस्वी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. उघड्या वायर्स, सदोष पथदिवे किंवा भूमिगत केबल्सची योग्य निगा न राखल्याने पावसाळ्यात अशा जीवघेण्या घटना घडत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सध्या केवळ अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी, स्थानिक नागरिकांमध्ये कंत्राटदार आणि इलेक्ट्रिक कंपनीच्या विरोधात प्रचंड खळबळ आणि नाराजी आहे.

फौजदारी गुन्हा  दाखल करण्याची मागणी

हा केवळ अपघात नसून प्रशासकीय निष्काळजीपणामुळे झालेला बळी आहे. त्यामुळे या कामासाठी जबाबदार असणारे महानगरपालिकेचे कंत्राटदार आणि वीज कंपनीचे संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा किंवा निष्काळजीपणाचा थेट फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा. जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हे ही वाचा :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *