IND vs ENG: म्हणे नंबर वन बॅट्समन… आयर्लंडनंतर आता इंग्लंडसमोरही पचका, वर्ल्ड चॅम्पियन फलंदाजाचे दिवस फिरले! – Marathi News | Ishan kishan again run out on duck during india vs england 1st t20 match


भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु झाली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पहिल्या सामन्यात फक्त 20 षटकांचा खेळ झाला तर उर्वरित 20 षटकांचा खेळ पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली नाही तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांनाचा सलामीची संधी मिळाली. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येणाऱ्या इशान किशनसोबत वाईट घडले. तो खाते ही उघडू शकला नाही. ज्यादिवशी तो नंबर वन ठरला त्याच दिवशी नेमका तो असा बाद झाला.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात, इशान किशन पुन्हा एकदा धावबादचा बळी ठरला. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याला खेळपट्टीच्या मधोमध परतावे लागले आणि इंग्लंडने याचा पुरेपूर फायदा घेत त्याला धावबाद केले. इंग्लंड आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना बुधवारी (1 जुलै) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि पहिल्याच षटकांमध्ये त्यांना दोन मोठे धक्के बसले.

संजू सॅमसन केवळ 1 धावेवर बाद झाल्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशान किशनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो पुन्हा एकदा धावबाद झाला आणि एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. ही घटना भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदने टाकलेला लेंथ चेंडू इशान किशनने हलक्या हाताने मिड-ऑनच्या दिशेने खेळला आणि लगेचच एक धाव घेण्यासाठी धावला. मात्र, दुसऱ्या टोकावरील अभिषेक शर्माने त्याला परत पाठवले. तोपर्यंत इशान खूप पुढे गेला होता आणि वेगाने क्रीजकडे परत येत होता.

दरम्यान, हॅरी ब्रुकने चपळाईने चेंडू उचलला आणि यष्टीरक्षक जोस बटलरकडे अचूकपणे फेकला. बटलरने कोणतीही चूक न करता बेल्स उडवल्या. इशानने झेप घेतली आणि क्रीजपर्यंत पोहोचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसले की त्याची बॅट क्रीजपर्यंत पोहोचण्यापूर्वीच बेल्स उडाल्या होत्या. अशाप्रकारे, इशान किशन खाते न उघडताच धावबाद झाला आणि दुसऱ्या षटकात 6 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला.

चुकीच्या संवादामुळे इशान किशन धावबाद होण्याची ही पहिली वेळ नाही. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही तो तिलक वर्मासोबत त्याला ताळमेळ साधता आला नाही आणि तो धावबाद झाला होता. त्या सामन्यात त्याने 11 चेंडूंमध्ये 12 धावा केल्या. सलग दुसऱ्यांदा त्याची विकेट गमावणे हे भारतीय संघ आणि इशान किशन या दोघांसाठीही निश्चितच निराशाजनक होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *