Sankashti Chaturthi 2026: 3 की 4 जुलै..संकष्टी चतुर्थी तिथीबाबत संभ्रम? दैवी योगायोग जुळणार, 5 राशींची भरभराट, योग्य तिथी, चंद्रोदय, पूजा पद्धत जाणून घ्या.. 


Sankashti Chaturthi 2026: तू सुखकर्ता तू दुःखहर्ता… विघ्नविनाशक मोरया… संकटीं रक्षी शरण तुला मी… गणपती बाप्पा मोरया… भगवान गणेश… ज्याच्या केवळ नामस्मरणानेच अवघं जीवन मंगलमय होते. अशा या बाप्पाला समर्पित संकष्टी चतुर्थी लवकरच येत आहे. हिंदू धर्मात भगवान गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, जेव्हा संकष्टी चतुर्थीचा विषय येतो, तेव्हा भक्तांचा उत्साह दुप्पट होतो. नुकताच जुलै महिना सुरू झाला आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष आणि दुर्मिळ आहे. जिला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात, कारण तब्बल 3 वर्षांनी दैवी योगायोग जुळून आला आहे, यंदाची ही संकष्टी चतुर्थी 3 की 4 जूनला आहे? भाविकांमध्ये या चतुर्थीच्या तिथीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जाणून घेऊया भाग्यशाली राशी, योग्य तिथी, चंद्रोदय वेळ, पूजेची पद्धत…

यंदाची संकष्टी चतुर्थी विशेष का आहे? (Sankashti Chaturthi 2026)

सनातन धर्मात, भगवान गणेशाला समर्पित संकष्टी चतुर्थी दिवस हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. जुलैच्या सुरूवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी खूप विशेष आहे कारण ही कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी आहे, ही चतुर्थी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला येतेय. यावर्षी, संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, ज्या दरम्यान विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा केली जाईल. संकष्टी चतुर्थीची तिथी, शुभ वेळ आणि महत्त्व याबद्दल जाणून घेऊया. 

3 की 4 जुलै? संकष्टी चतुर्थी तिथी नेमकी कधी? (Sankashti Chaturthi 2026 Tithi)

मराठी दिनदर्शिकेनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवार, 3 जुलै रोजी सकाळी 11:30  वाजता सुरू होईल. ही तिथी शनिवार, 4 जुलै रोजी दुपारी 12:39 वाजता समाप्त होईल. उदय तिथी आणि चंद्रोदयाच्या वेळेवर आधारित, कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी शुक्रवार, 3 जुलै रोजी असेल…

संकष्टी चतुर्थी 2026 चंद्रोदय वेळ (Sankashti Chaturthi 2026 Moon Rise)

धार्मिक मान्यतेनुसार, चंद्राची पूजा आणि प्रार्थना केल्याशिवाय उपवास अपूर्ण आहे. संकष्टी चतुर्थीच्या उपवासात लोक चंद्रोदयाची वाट पाहतात. या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री 9:52 वाजता होईल.

कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थीला जुळतोय शक्तिशाला योग…

वैदिक पंचांगानुसार यावर्षी संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 5:28 वाजता तयार होईल आणि सकाळी 11:46 पर्यंत राहील. या योगामध्ये गणेशाची आराधना केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. याव्यतिरिक्त, त्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत विष्कंभ योग आणि त्यानंतर प्रीती योग असेल. सकाळी 11:46 वाजेपर्यंत श्रावण नक्षत्र आणि त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र असेल.

संकष्टी चतुर्थी 2026 मुहूर्त

जुलैमध्ये संकष्टी चतुर्थीला, ब्रह्म मुहूर्त पहाटे 4:07 ते पहाटे 4:47 पर्यंत आहे तर अभिजित मुहूर्त सकाळी 11:57 ते दुपारी 12:53 पर्यंत आहे. गणेशपूजेसाठी लाभ मुहूर्त सकाळी 7:12 ते 8:56 पर्यंत असतो, तर अमृत-संवाद मुहूर्त सकाळी 8:56 ते 10:41 पर्यंत असतो.

संकष्टी चतुर्थी 5 राशींसाठी भाग्यशाली!

ज्योतिषशास्त्रानुसार, 3 जुलै 2026 रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने भगवान गणेशाच्या कृपेने काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी गणेशपूजा, चंद्रदर्शन आणि व्रत केल्यास विघ्नांचा नाश होतो आणि शुभ परिणाम मिळतात.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव कमी होईल.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या व्यक्तींना नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल राहू शकतो. प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn)

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. घरात शुभकार्याचे नियोजन होईल. आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील.

संकष्टी चतुर्थीला काय करावे?

भगवान गणेशाला दुर्वा, लाल फुले आणि मोदक अर्पण करा.
“ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा.
संध्याकाळी चंद्रदर्शन करून व्रताचे पारण करा.
गरजूंना अन्नदान किंवा दानधर्म केल्यास शुभ फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

हेही वाचा :

Shani Transit 2026: आज शनि नक्षत्र बदलणार, 4 राशींचं टेन्शन वाढणार, जुलै महिना शनि चांगलाच गाजवणार, मागोमाग अडचणी, आर्थिक नुकसान? 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *