Nitesh Rane : ‘XXX माणूस आहे हा, डिक्शनरीत XXXX इक्वल टू उद्धव ठाकरे’ नितेश राणेंची बोलताना जीभ घसरली – Marathi News | After Sachin Ahir left ubt Nitesh rane slam uddhav Thackeray veray hard


आज सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना असा सामना सुरु आहे. सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांची या विषयावर प्रतिक्रिया देताना जीभ घसरली. ते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नको ते बोलून गेले. “महाराष्ट्रातील अभिषेक बॅनर्जी उबाठा गटाला खाली करणार आहे. टीएमसी सारखंच होणार आहे” असं नितेश राणे म्हणाले. त्यांचा रोख आदित्य ठाकरेंकडे होता. “आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन निवडून यावं परत. राजीनामा द्यावा आणि हिंमतीवर निवडून यावं. सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यामुळे ते सभागृहात बसतात आणि टोमणे मारतात. बिचाऱ्यांचे दिवस अवघड आहेत” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.

“आता उद्धव ठाकरेंनी वरळीतही एक सभा घ्यावी. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरातील लोकांचा मूळ स्वभाव आहे, त्यामुळे लोक जात आहेत. जाणारे सर्व लोक महत्त्वाचे आहेत. जो बाळासाहेबांचा झाला नाही. आपल्या वडिलांचा झाला नाही, तो बाकी नेत्यांचा काय होणार?” असं नितेश राणे म्हणाले. “फडणवीसांना पाठिंबा देणार म्हणतात, त्यांनी 2019 मध्ये माती खाल्ली. आता पंतप्रधान पदाला पाठिंबा देण्याची भाषा करत आहे. नीच माणूस आहे हा. डिक्शनरीत नीच इक्वल टू उद्धव ठाकरे होतं” अशी वादग्रस्त टिप्पणी नितेश राणे यांनी केली.

राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवलं ते भोगणार आहे

“2019 मध्ये असं केलं नसतं तर आज हे दिवस बघावे लागले नसते. हिंदुत्वाच्या विरोधात गेल्यावर असंच होणार” असं नितेश राणे म्हणाले. “गणेश नाईक, राज ठाकरे, राणे साहेब, आता एकनाथ शिंदे आणि बाकीचे खासदार, आमदार बाहेर जातात. उद्धव ठाकरेंना सोडून सर्व जात आहेत. एकाच माणसाला वैतागून जात आहेत. याने गुपचूप घरात बसावं नाही तर वृद्धाश्रमात जाऊन राहावं. शेवटच्या काळात बाळासाहेबांचा छळ केला. ते भोगणार आहे. राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवलं ते भोगणार आहे. 2019 च्या आधी फडणवीस यांनी राजासारखं ठेवलं. त्यांनाच दगा दिला” असं नितेश राणे म्हणाले.

आता मुलाचं भवितव्य अंधारात टाकलं

“उद्धव ठकारेंमध्येच फॉल्ट आहे. आता मुलाचं भवितव्य अंधारात टाकलं. सचिन अहिर ज्येष्ठ नेता आहे. मोठा माणूस आहे. कामगार क्षेत्रातील मोठं नाव आहे. वरळीतील चार लोकांची नावे तरी आदित्यला माहीत आहे का? अहिर आणि सुनील शिंदेंमुळे निवडून आले आहेत. सुनील शिंदेंना सांगतो नका राहू तिथे. या इकडे” असं नितेश राणे म्हणाले.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *