Fact Check: 4,90,00,00,000 रुपये रोख, 27 किलो प्युअर गोल्ड अन् सोन्याची ब्रा आणि पँटी जप्त, खासदारबाईच्या घरी खरंच घबाड सापडलं? | विदेश बातम्या


Last Updated:

जवळपास ४९० कोटी रुपये जप्त केले. एवढंच नाहीतर २७ किलो शुद्ध सापडलं. यात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सोन्याची ब्रा आणि पँटी सुद्धा सापडली.

News18
News18

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही, मुळात हे व्हायरल च्या नावाखाली हा अफवा पसरवण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे एखादी घटना वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते. अशातच एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. एका महिला खासदाराच्या घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये तब्बल ४९० कोटी रुपये, २७ किलो सोनं आणि सोन्याने तयार केलेली ब्रा आणि पँटी जप्त केली, अशी बातमी व्हायरल झाली आहे. पण, हे खरं आहे का?

त्याचं झालं असं की, सोशल मीडियावर एक घटना वेगाने व्हायरल झाली आहे. इराकमधील एक खासदार  हिंद अल-अब्बासी (Hind Al-Abbasi) यांच्या घरी बेकायदेशीर संपत्ती बाळगल्या प्रकरणी कारवाई केली. या कारवाईचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे. घरात तब्बल ५७ मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे, भारतीय रक्कमेनुसार, जवळपास ४९० कोटी रुपये जप्त केले. एवढंच नाहीतर २७ किलो शुद्ध सापडलं. यात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सोन्याची ब्रा आणि पँटी सुद्धा सापडली. आता असं काही सापडल्याामुळे सोशल मीडियावर एकच कल्लोळ उडाला.

पण प्रकऱण नेमकं आहे काय? 

इराक सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी कारवाई करत खासदार हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर छापा टाकला असं पसरवण्यात आलं. पण, याची पडताळणी केली असता सोशल मीडियावर पेरलेली ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं.  ‘गल्फ न्यूज’ सारख्या वृत्तसंस्थेसह अनेक  आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, इराकमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली आहे,  या कारवाईमध्ये मोठे अधिकारी, खासदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना अटक सुद्धा केली आहे. पण, ज्या खासदाराच्या घरातून रोख रक्कम आणि सोनं सापडलं, त्या हिंद अल-अब्बासी नसून खासदार आलिया नासिफ (Alia Nassif) असल्याचं सांगण्यात आलं आहे.  आलिया नासिफ यांच्या घरातून १५.५ मिलीयन डॉलर्सपेक्षा जास्त रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात सोनं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मग सोन्याची ब्रॉ आणि पँटी खरंच सापडली का? 

यामध्ये हिंद अल अब्बासी यांचा काहीही संबंध नसल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या घरातून  ५७ मिलियन डॉलर्स, २७ किलो सोनं आणि सोन्याची ब्रा-पँटी जप्त केल्याचा कोणतीही माहिती इराक सरकारकडून देण्यात आली नाही. कोणत्याही तपास यंत्रणेनंही याला दुजोरा दिला नाही. फक्त, काही सोशल मीडिया आणि पोर्टलवर ही बातमी देण्यात आली. जरं असं काही सापडलं नाही, कुणी पुष्टी केली नसेल तर अशा दाव्यांना कोणतीही अर्थ नाही.

दरम्यान, इराकमध्ये सध्या जोरदार भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहिम सुरू आहे. अनेक मोठ्या नेते आणि उद्योगपतींवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत ४७ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये खासदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर काही माजी तेल मंत्र्यांची चौकशीही सुरू आहे. आतापर्यंत एका माजी तेलमंत्र्यांशी संबंधित प्रकरणात सुमारे १० दशलक्ष डॉलर्स, ३ अब्ज इराकी दिनार, मोठ्या प्रमाणात सोनं, डझनभर मालमत्ता आणि शस्त्रं जप्त करण्यात आली आहे.

कोण आहेत खासदार आलिया नासिफ?

आता ज्या आलिया नासिफ यांच्या घरावर छापा टााकला आहे, त्या या इराकच्या संसदेच्या कौन्सिल ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या प्रसिद्ध खासदार आहेत. एक फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्या नेहमी आक्रमकपणे भूमिका मांडतात. एवढंच नाहीतर त्या  संसदेच्या कायदेशीर समितीच्या सदस्या होत्या. अनेक पदं त्यांनी भुषावली होती.  इराक सरकारवर त्यांनी आक्रमक भूमिकाही घेतली होती. तसंच इराकमधील  बालविवाहाचे किमान वय कमी करण्यासारख्या वादग्रस्त प्रस्तावाला त्यांनी विरोध केला होता.

मराठी बातम्या/विदेश/

Fact Check: 4,90,00,00,000 रुपये रोख, 27 किलो प्युअर गोल्ड अन् सोन्याची ब्रा आणि पँटी जप्त, खासदारबाईच्या घरी खरंच घबाड सापडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *