Last Updated:
केतन हत्याकांड प्रकरणात पोलीस क्रॉस मॅरेज म्हणजेच डबल वेडिंगचा नवा अँगल समोर आला असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे : केतन अग्रवालची निर्घृण हत्या झाली, त्या घटनेला आता पंधरवडा उलटला पण हे हत्याकांडच इतकं भयंकर आहे की, तो लोकांना विसरता येईना.. रोज या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहे. केतन हत्याकांड प्रकरणात पोलीस क्रॉस मॅरेज म्हणजेच डबल वेडिंगचा नवा अँगल समोर आला असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
लोणावळ्यातील लोहगडावरून 18 जूनला केतन अग्रवालला दरीत ढकलून दिलं त्याची तिथं निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेला आता दोन आठवडे उलटले. लग्न ठरलेलं असताना होणाऱ्या बायकोने म्हणजे सिया गोयलने केतनचा बळी घेतला. त्यात तिला तिचा प्रियकर असलेल्या चेतन चौधरीने मदत केली. तर सियाचा भाऊ साहिलला या प्रेमप्रकरणाची माहिती असून फक्त क्रॉस मॅरेजमुळे त्याने ही माहिती लपवल्याचा संशय आहे. केतन अग्रवालचं लग्न सीया गोयलशी तर केतनच्या बहिणीचं लग्न सीयाचा भाऊ साहिल गोयलसोबत ठरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नोव्हेंबर महिन्यात केतन-सीया आणि त्यानंतर साहिल-केतनच्या बहिणीचं लग्न होण्याचा प्लान असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
सियाचा भाऊ काही लपवतोय का?
केतन-सीया आणि त्यानंतर साहिल-केतनच्या बहिणीचं लग्नामुळे दोन्ही कुटुंबातील नातं मजबूत करण्यासाठी ६ जून रोजी बालीमध्ये प्री-वेडिंग शूटचं प्लानिंग करण्यात आलं होतं. प्री-वेडिंग शूटमध्ये सीया-केतनसह साहिल आण केतनची बहीण सामील होण्याची तयारी होती. अग्रवाल कुटुंबाच्या जवळच्या लोकांनीही क्रॉस मॅरेजचा प्लान असल्याचा दावा केला आहे. पोलीस या प्रकरणात सर्व अँगलने तपास करीत आहे आणि साहिलची भूमिकाही तपासाच्या चौकटीत आली आहे.
लोहगडावरून केतनचा पुतळा ढकलला
लोहगडावरील ज्या ठिकाणी केतन अग्रवालची हत्या करण्यात आली, त्याठिकाणी पोलीस अनेक अंगांनी चौकशी करतायत. रविवारी सियाला त्याठिकाणी नेलं होतं, तर चेतन चौधरीलाही लोहगडावर नेऊन घटनेचं री-क्रिएशन करण्यात आलं. यावेळी केतन अग्रवालचा पुतळा बनवून तो चेतनला दरीत ढकलण्यास सांगितले. आरोपीची कबुली आणि घटनास्थळाची परिस्थिती जुळते का? यासाठी हे करण्यात आले आहे.
री-क्रिएशन कशासाठी करतात?
गुन्ह्यातील हत्यार, रक्ताचे डाग यांसारखे फॉरेन्सिक पुरावे मिळवण्यासाठी प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि आरोपीचं कृत्य यांतील साम्य शोधण्यासाठी री-क्रिएशनच्या नोंदी कोर्टात पुरावा आणि सबळ युक्तिवादासाठी वापरतात आणि या संपूर्ण री-क्रिएशनच्या बारीक-सारीक गोष्टींची नोंद पोलिसांनी केली. ज्याद्वारे या हत्याकांडाबाबत सबळ पुरावे जमा करता येतील. अर्थातच, केतनच्या हत्येच्या आरोपातून सिया आणि चेतनला पळवाट सापडू नये आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, असाच तपास पोलीस आता करत आहेत.
Pune,Maharashtra
सियाचा भाऊ काही लपवतोय का? एका लग्नाचा विचार पण समोर आला दोन लग्नांचा भयंकर प्लॅन, केतन हत्याकांडात नवा ट्विस्ट
