Raigad News : राज्यातील बहुतांश भागात पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं शेती कामांना देखील वेग आला आहे. तर काही भागात अद्याप कमी पाऊस असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी चांगल्या पावसाची गरज आहे. दरम्यान, सध्या कोकणात देखील पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. या काळात कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. अशातच रायगड जिल्गह्यातील दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी अंगलट आल्याची घटना घडली आहे. भर पावसात महिंद्रा थार आणि मारुती स्विफ्ट कार थेट समुद्र किनाऱ्यावर नेण्यात आली होती. यानंतर मारुती स्विफ्ट कार वाळूत रुतून बसली आहे.
स्थानिकांनी सूचना देऊन सुद्धा हुल्लडबाजी
श्रीवर्धन मधील दिवेआगर हनुमान पाखाडी समुद्रकिनाऱ्यावर मारुती स्विफ्ट कार वाळूत रुतून बसल्याची घटना घडली आहे. पर्यटकांचा अतिउत्साहीपणा नडला आहे. स्थानिकांनी सूचना देऊन सुद्धा हुल्लडबाजी करण्यात आली. रायगडमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी साचले आहे. वाहन चालकांची मुंबई गोवा महामार्गावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत होत आहे. पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माणगाव जवळील मुगवली फाटा आणि ढालघर फाटा परिसरात पाणीच पाणी साचलं आहे.
ठाण्यात गेल्या 8 तासात 82.76 मिमी पावसाची नोंद
राज्यातील अनेक भागात जोरजदार पाऊस कोसळताना दिसत आहे. मुंबसह ठाणे, पालगऱ परिसार त पावसानं जोरदार बॅटींग केली आहे. ठाण्यात गेल्या 8 तासात 82.76 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून पावसाची बॅटिंग सुरुच आहे. दुपारच्या वेळेस थोडी उसंत घेतल्याने सखल भागात साचत असलेले पाणी उतरले आहे.
मात्र, पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पाणी भरु शकते. दुपारी 2.25 वाजता मोठी भरती होती, त्यामुळे मुंब्रा भागात पाणी साचले होते. पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे.
उल्हासनगरच्या बाबा साईनगर मधील घरांमध्ये पाणीच पाणी
उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील बाबा साईनगर मधील पन्नास ते साठ घरं पाण्याखाली आले आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या घरांमध्ये पाणी जमा झाले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने नाले सफाईचे दावे केले होते ते फोल ठरत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात खरिपाच्या पेरणीला सुरुवात
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. खरिपाच्या पेरणीला पूरक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरणीला जोर येणार आहे. बी – बियाणे व खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. यंदा कपाशी, मका, भुईमूग व इतर कडधान्य पेरणीला शेतकऱ्यांची पसंती राहणार आहे.
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह