Sunil Shinde Shivsena: ठाकरे गटाचा वरळीतील आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? सुनील शिंदेंना नीलम गोऱ्हेंची भावनिक साद, म्हणाल्या….


Sunil Shinde may join Shivsena Speculations: वरळी मतदारसंघात स्ट्राँगहोल्ड असलेल्या सचिन अहिर यांच्यापाठोपाठ शिंदे गटाने ठाकरेंच्या आणखी एका आमदाराला गळाला लावण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्यापाठोपाठ ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) हेदेखील शिवसेनेत जाऊ शकतात, अशी कुजबूज आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडूनही आमदार शिंदे यांना भावनिक साद घालण्यात आली आहे. शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी बुधवारी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील शिंदे यांना जाहीरपणे आपल्या पक्षात येण्याची साद घातली. (Maharashtra Politics News)

कोणी नाराज असेल तर त्यांनी ती एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवावी. आमच्या पक्षात कामाची मोठी संधी आहे.  माझ्या नाराजीबद्दल तुमच्या मनातली जी चिंता आहे, ती काढून टाका असं मला वाटते. बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गावर चालणारे नेते म्हणून ममत्व त्यांना असेल तर सुनील शिंदे निर्णय घेतील. शिवसेनेत सचिन आहिर यांच्या प्रवेशामुळे किंवा त्यांना उपसभापती पद दिल्याने कुठलीही नाराजी नाही. ही फक्त माध्यमांमधील चर्चा आहे. आता जे  परवा आलेत ते काल आलेल्यांवर टीका करत आहेत. यातून तुम्ही समजा. पक्षातील आमदारांमध्ये नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षश्रेष्टींकडे बोलून दाखवावी. नक्कीच त्या संविधानिक पदावर काम करण्याची संधी ही प्रत्येकालाच हवी असते त्यामुळे काही नाराज असतील. दुसरीकडे सुनिल शिंदे असतील किंवा अन्य कोण पक्ष प्रवेश कोण करतयं हे शिंदेशिवाय कुणालाही माहित नाही, त्यांच्या डोक्यातलं जर कोणाला कळालं तर तुम्ही देशातील खूप मोठी डिटेक्टिव एजन्सी ठराल, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.

Sunil Shinde: सुनील शिंदे काय म्हणाले?

माध्यमांमधील चर्चा सर्व निराधार आहेत. माझे हित शत्रू या प्रकारच्या  वावड्या उठवत आहेत. त्या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण सुनील शिंदे यांनी दिले. सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर मंगळवारी सुनील शिंदे यांनी एक वक्तव्य केले होते. आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला हवं होतं. कारण सचिन अहिर यांचं ज्या पद्धतीने चाललं होतं, त्याबाबत मला कल्पना आली होती. परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे यावर भाष्य करु शकत नव्हतो, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतरच सुनील शिंदे हे ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.

ठाकरे गटाच्या विधानपरिषदेतील आमदारांची यादी- (Shivsena UBT Vidhan Parishad MLA List)

  • सुनिल शिंदे
  • ज.मो.अभ्यंकर
  • अंबादास दानवे
  • मिलिंद नार्वेकर
  • अनिल परब

आणखी वाचा

Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *