मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर येथे काल (मंगळवारी, ता 30) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड उन्मळून (Tree Collapse) पडल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत (chembur tree collapse) एका ११ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे. अशातच मुंबईतील झाडे कोसळण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अंतर्गत पत्रव्यवहारातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने रस्ते विभागाला किमान दोन वेळा लेखी पत्राद्वारे इशारा देत रस्ते आणि पावसाळी गटारांच्या (स्टॉर्म वॉटर ड्रेन) कामांदरम्यान झाडांच्या बुंध्याजवळ (Tree Collapse) करण्यात येणारे उत्खनन झाडांच्या मुळांना गंभीर हानी पोहोचवत असल्याचे नमूद केले होते.(Tree Collapse)
या पत्रांमध्ये अशा प्रकारच्या उत्खननामुळे झाडांची पकड कमकुवत होत असून, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या वेळी ही झाडे कोसळण्याचा धोका वाढत असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. त्यामुळे झाडांच्या मुळांजवळ खोदकाम करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या आणि संबंधित कामांचे नियोजन करण्याच्या सूचनाही उद्यान विभागाने रस्ते विभागाला दिल्या होत्या.
मात्र, या इशाऱ्यांनंतरही अनेक ठिकाणी झाडांच्या मुळांजवळ उत्खनन सुरूच राहिल्याने मुंबईतील झाडे कोसळण्याच्या घटनांबाबत प्रशासनाच्या समन्वयावर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.(Tree Collapse)
Tree Collapse : अंधेरी पश्चिमेत आरटीओजवळ गुलमोहराचे झाड कोसळले
मुंबईत पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटना सुरूच असून, बुधवारी अंधेरी पश्चिम येथील आरटीओ कार्यालयाजवळ एक मोठे गुलमोहराचे झाड अचानक कोसळले. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहनांची रांग लागली. मात्र, सुदैवाने झाड कोसळत असताना त्याखाली कोणतेही वाहन किंवा पादचारी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.
चेंबूरमध्ये बसवर झाड कोसळल्याच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतील ही घटना घडल्याने मुंबईतील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी पावसाळ्यात अशा धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Chembur Tree Collapse : धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक झाडं कोसळलं अन्…
मुंबईतील चेंबूर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना समोर आली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भलामोठं झाडं कोसळलं. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक शाळकरी मुले उपस्थित होते. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून, या अत्यंत दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तब्बल 10 शाळकरी मुले गंभीररीत्या जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बस टिळकनगरमधील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे.
घटना घडली त्या क्षणी परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जखमी मुलांना बाहेर काढण्यात यश आले असले, तरीही एक शाळकरी मुलगा बसमध्येच अडकला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यामध्ये यश आलं नाही. एका विद्यार्थ्याचा यामध्ये मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह