Pune Accident News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने टेम्पो चालवून चार वाहनांना धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील हडपसर भागात ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनांची नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांच्या सुचनेला न जुमानता हा टेंपो वेगाने पुढे निघाला
टेम्पो पॉइंट दरम्यान पोलिसांनी MH 42 AR 4246 या क्रमांकाचा टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सुचनेला न जुमानता हा टेंपो वेगाने पुढे निघाला. यावेळी चार वाहनांना या टेम्पोने धडक दिली. टेम्पो थांबल्यानंतर लोकांनी या 17 वर्षांच्या टेम्पो चालकाला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं. त्यानंतर टेम्पोच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील कराड तासगाव मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी-चिक्कोडी रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबाला धडकून शेतात उलटला. ट्रक उलटून भीषण अपघात झाला असला, तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
राखेने भरलेला हा ट्रक अत्यंत वेगाने हिरेकोडी-चिक्कोडी रस्त्यावरून जात होता. अचानक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याशेजारी असलेल्या वीज खांबावर जाऊन जोरात धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, वीज खांब पूर्णपणे मोडून पडला आणि ट्रक थेट बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाला. वीज खांबाला धडक दिल्याने विद्युतभारीत ताराही खाली पडल्या पण अनर्थ टळला.
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह