सावकारी परवान्यासाठी घेतली 13 हजाराची लाच, सहाय्यक निबंधकासह तिघांना रंगेहात पकडलं, जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


Beed Crime News : बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. माजलगाव येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील सहाय्यक निबंधकासह त्यांच्या सहकाऱ्यांना 13 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. सूरज जगदाळे आणि सहकार अधिकारी सतीश शेरखाने यांना 13 हजार रुपयांची लाच घेताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
    
तक्रारदाराकडून सावकारी परवाना मंजूर करुन देण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी 13 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर जालना लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यानुसार दुपारी लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यासह एक खाजगी फफाळ नामक व्यक्तीला लाच घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. कारवाईनंतर तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

भंडाऱ्यात गांजा तस्करांवर मोठी कारवाई, तब्बल 2.35 कोटींचा मुद्देमाल जप्त 

मुंबईच्या नार्कोटिक्स विभागानं आज भंडाऱ्यात गांजा तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल 2.5 कोटींच्या गांजासह 30 लाखांचा ट्रॅक असा 2.35 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. ओडिशातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या केळीच्या आयशर ट्रकमधून गांजाची तस्करी केली जात होती. अखेर या गांजा तस्करांवर मुंबईच्या नार्कोटिक्स विभागानं मोठी कारवाई केली आहे. 

केळीच्या कॅरेटमध्ये लपवून एका आयशर ट्रकमधून गांजाची तस्करी

केळीच्या कॅरेटमध्ये लपवून एका आयशर ट्रकमधून गांजाची तस्करी होत होती. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या ट्रकवर नार्कोटिक्स विभागानं भंडाऱ्यात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. ओडिशा येथून मुंबईच्या दिशेने या आयशर ट्रक मधील कॅरेटमध्ये लपवून सुमारे 245 किलो गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाला मिळाली होती. या माहितीवरुन या विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या आयशर ट्रकचा पाठलाग केला. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा येथील टोल नाक्यावर या आयशर ट्रकला सापळा रचून थांबवण्यात आलं. ट्रकची झडती घेतली असता कॅरेटमध्ये लपवून गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी नार्कोटिक्स विभागाच्या पथकानं ट्रक चालक आणि क्लीनरला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 2.5 कोटींचा 245 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत ट्रक चालक कमलेश बघेल (42 ) नागपूर आणि क्लिनर प्रशांत दुर्बे (22) अमरावती या दोघांना अटक केली असून ज्या आयशर ट्रकमधून ही वाहतूक करण्यात येत होती तोही आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *