9 वर्षांचा मुलगा भगतसिंगचा फॅन… विद्यार्थी आंदोलनावर रोहित शर्माच्या पत्नीची रिएक्शन, Video | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर वेगवेगळ्या सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहनेही तिच्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे.

9 वर्षांचा मुलगा भगतसिंगचा फॅन... विद्यार्थी आंदोलनावर रोहित शर्माच्या पत्नीची रिएक्शन, Video
9 वर्षांचा मुलगा भगतसिंगचा फॅन… विद्यार्थी आंदोलनावर रोहित शर्माच्या पत्नीची रिएक्शन, Video

मुंबई : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर वेगवेगळ्या सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहनेही तिच्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे. रितिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. 9 वर्षांचा मुलगा दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रॉच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झाला, या आंदोलनात मुलाने एक मुलाखत दिली. ही मुलाखत रितिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. याचसोबत तिने भावुक इमोजीही लावला.

9 वर्षांचा मुलगा भगत सिंगचा फॅन

रितिका सजदेहने शेअर केलेल्या रीलमध्ये एक महिला रिपोर्टर एका लहान मुलासोबत बोलताना दिसत आहे. पोलीस लाठी घेऊन आले तर? असा प्रश्न महिलेने मुलाला विचारला. त्यावर येऊ दे मारू दे, देशासाठी आलो आहे. तुझ्यामध्ये एवढी देशभक्ती कशी? त्यावर तो मला भगतसिंग सारखं बनायचं आहे, असं म्हणतो.

रितिकाने शेअर केली रील

‘भगतसिंगपासून प्रेरणा घेतलेला 9 वर्षांचा आंदोलक, लाठीलाही घाबरत नाही’, असं रितिकाने तिच्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे. रितिकाची ही रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही जणांनी रितिकाने सीजेपी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं म्हणलं आहे, तर काही जण याला मुलाचं भगतसिंग प्रेम म्हणूनही पाहत आहे.

लंडनमध्ये होती रितिका

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकलं. लॉर्ड्सवर झालेल्या या सामन्यात रोहितला पाठिंबा देण्यासाठी रितिका लंडनमध्ये होती. रोहितच्या शतकानंतर रितिकाच्या डोळ्यात अश्रू आले होते. रोहितने 110 बॉलमध्ये 138 रनची खेळी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *