IND vs ZIM : इंग्लंडच्या सॅम करनचा सख्खा भाऊ झिम्बाब्वेच्या टीममध्ये, भारताविरुद्ध मैदानात उतरणार! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


भारताविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याचा सख्खा भाऊ बेन करनही खेळताना दिसेल. सॅम करन हा नुकताच भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये इंग्लंडकडून खेळला होता.

सॅम करनचे वडीलही झिम्बाब्वेचे खेळाडू

सॅम करन याचे वडील केव्हिन करन हेदेखील झिम्बाब्वेकडून खेळले आहेत. केव्हिन करन यांनी झिम्बाब्वेकडून 11 वनडे मॅच खेळल्या, ज्यात 1983 आणि 1987 च्या वनडे वर्ल्ड कपचाही समावेश होता. केव्हिन करन यांना 3 मुलं आहेत यातले सॅम करन आणि टॉम करन हे इंग्लंडकडून खेळतात तर बेन करन हा झिम्बाब्वेकडून खेळत आहे.

वेस्ले मधेवीरे याने झिम्बाब्वेकडून शेवटचा टी-20 सामना मागच्या वर्षी जुलै महिन्यात खेळला होता. मधेवीरे याच्याकडे 79 टी-20 सामन्यांचा अनुभव आहे. यात त्याने 1256 रन केले असून 15 विकेटही घेतल्या आहेत. तर टेस्ट आणि वनडे खेळलेल्या न्यूमेन न्यामुरी पहिल्यांदाच टी-20 टीममध्ये आला आहे. तफदजवा सिगा याने याआधी एकमेव टेस्ट मॅच खेळली आहे.

भारत-झिम्बाब्वे सीरिजचं वेळापत्रक

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या टी-20 सीरिजला 23 जुलैपासून सुरूवात होणार आहे. सीरिजचा दुसरा सामना शनिवारी आणि तिसरा सामना रविवारी होणार आहे. सीरिजच्या तिन्ही मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरू होतील, तर टॉस दुपारी 4 वाजता होईल. टीव्हीवर हे सामने Unite8 स्पोर्ट्सवर पाहता येतील, तर मोबाईलवर मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोडवर पाहता येईल.

झिम्बाब्वेची टीम

सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, टनका चिवांगा, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ले मधेवीरे, तडीवांशे मारूमानी, वेलिंग्टन मसकादजा, ब्लेसिंग मुझरबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगरवा, न्यूमेन न्यामुरी, तफदजवा सिगा, मिल्टन शुंबा

भारतीय टीम

श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, इशान किशन, शिवम दुबे, सुर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, रवि बिष्णोई, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *