Monsoon Care : पावसाळ्यातला कुबट वास कसा घालवायचा ? नैसर्गिक उपायांच्या मदतीनं पावसाळ्यातही वाटेल ताजंतवानं | लाइफस्टाईल बातम्या


Last Updated:

पावसामुळे निर्माण होणारा ओलावा आणि दमटपणामुळे घरांमधे कुबट वास येतो. अनेकजण यावर उपाय म्हणून रूम फ्रेशनरचा वापर करतात, पण त्याचा परिणाम सहसा अल्पकाळच टिकतो. काही नैसर्गिक उपायांच्या मदतीनं पावसाळ्यातील हा वास दूर करता येऊ शकतो.

News18
News18

मुंबई : पावसाळा सुरु झाला की वातावरण थंड होतं. थंड वाऱ्यामुळे, मुसळधार पावसामुळे उकाडा कमी होतो पण या काळात घरात अनेकदा एक विशिष्ट प्रकारचा वास येतो.

पावसामुळे निर्माण होणारा ओलावा आणि दमटपणामुळे घरांमधे कुबट वास येतो. अनेकजण यावर उपाय म्हणून रूम फ्रेशनरचा वापर करतात, पण त्याचा परिणाम सहसा अल्पकाळच टिकतो. काही नैसर्गिक उपायांच्या मदतीनं पावसाळ्यातील हा वास दूर करता येऊ शकतो.

पावसाळ्यात अनेकदा गादीला उग्र वास येऊ लागतो. हा वास घालवण्यासाठी सूर्यप्रकाश हा सर्वात नैसर्गिक उपाय असला, तरी पावसाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यानं हा उपाय प्रभावी ठरत नाही.

हा वास घालवण्यासाठी संपूर्ण गादीवर बेकिंग सोडा भुरभुरावा. काही वेळानं व्हॅक्यूम क्लीनरच्या साहाय्याने तो बेकिंग सोडा काढून टाकावा; यामुळे गादीचा वास नाहीसा होईल.

शू रॅक – पावसाळ्यात ओले बूट आणि चपलांमुळे शू रॅकमधे अनेकदा तीव्र दुर्गंधी निर्माण होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी, शू रॅकच्या आत कापूर आणि लवंग असलेली एक वाटी ठेवा; यामुळे पावसामुळे येणारा कुबट वास नाहीसा होईल.

बेडरूममधील वास – कधीकधी, बेडरूममधील जुन्या उश्यांतूनही वास येतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी, एप्सम सॉल्टच्या एका छोट्या पिशवीत इसेन्शियल ऑइलचे काही थेंब टाका. त्यानंतर, ही पिशवी उशीच्या कव्हरमधे ठेवा. यामुळे दुर्गंधी नाहीशी होईल आणि खोलीत छान सुगंध दरवळेल.

कॉफी पावडर – कॉफीचा सुगंध आवडत असेल, तर ही पद्धत वापरून पाहू शकता. यासाठी एका लहान वाटीत थोडी कॉफी पावडर घ्या आणि ती दिवाणखान्यातील टेबलवर किंवा बेडरूमच्या कोपऱ्यात ठेवा. ही कॉफी पावडर घरातील दुर्गंधी शोषून घेईल आणि खोलीत कॉफीचा छान सुगंध दरवळेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/

Monsoon Care : पावसाळ्यातला कुबट वास कसा घालवायचा ? नैसर्गिक उपायांच्या मदतीनं पावसाळ्यातही वाटेल ताजंतवानं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *