Islampur city name change: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर होणार आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मान्यता दिली आहे. गेली अनेक वर्षे ही मागणी जोर धरत होती.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सांगलीमधील इस्लामपूर शहराचं नामांतर सध्या चर्चेत आलं आहे. या शहराच्या नामांतराला आता केंद्र सरकारनेही हिरवा झेंडा दाखवला आहे. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकने राज्य सरकारला यासंबधीतचे अधिकृत मान्यतेचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आता या शहराचे नाव अधिकृतपणे ईश्वरपूर असणार आहे. काही दिवसांआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाबद्दल विधानसभेमध्ये माहिती दिली होती.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर आता राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. सगळीकडे कागदोपत्री व्यवहारांमध्येही आता इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर केलं जाणार आहे. राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाने आवश्यक कागदपत्रे, प्रस्ताव आणि स्थानिक शिफारशीसह नामांतराचा हा अहवाल तयार करून पाठविला होता. दरम्यान, मान्यता मिळाल्यामुळे आता महाराष्ट्र सरकार पुढील प्रशासकीय कारवाई तथा अंमलबजावणी करण्यास सुरुवात करणार आहे. Jalna News: जालन्यात प्रसिद्ध उद्योगपतीच्या पुतण्याची गाडी अडवून जीवघेणा हल्ला, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल महायुती सरकारने याआधीही राज्यातील अनेक शहरांची नावे बदलली आहेत. राज्यात उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन शहरांची नावं बदलल्यानंतर आता इस्लामपूरचेही नाव बदलले जाणार आहे. त्यामुळे या यादीत एका नावाची भर पडली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामपूरचे नाव बदलावे अशी मागणी स्थानिक करत होते. सर्वप्रथम या नामांतराची ही मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पंत सबनीस यांनी 1970 मध्ये केली होती. त्यांच्या मते शहराचे नाव भारतीय संस्कृती आणि धार्मिक वारशाबरोबर सुसंगत असले पाहिजे असे होते. त्यानंतर पुढे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराच्या नामांतराची मागणी जाहीर सभेतून केली होती.
1986 मध्ये त्यांची शहराच्या यलाम्मा चौकात सभा झाली होती. तिथे भाषणात हे इस्लामपूर नव्हे तर ईश्वरपूर आहे, असा उच्चार त्यांनी केला होता. त्यानंतर या विषयाला पुढे अनेक वर्ष स्थानिक नागरिक, संस्था, आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. अखेर आज शहराच्या नामांतरचा मार्ग मोकळा झाला आहे. हे नामांतर होत असल्याने ज्यांची नामांतराची मागणी होती त्या सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे, काही ठिकाणी लोकांनी फटाकेही फोडले आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा